Biodata Maker marathi
✕

मुरमांवर घरच्या घरी उपाय

Updated: बुधवार, 28 मे 2008 (11:12 IST)
मुरमांमुळे त्वचा खडबडीत होते. सौंदर्यावर त्यामुळे डाग पडतो. चारचौघात जाणेही त्रासदायक वाटते. मुरम कोणत्याही वयात होऊ शकतात. तेलकट त्वचेच्या लोकांना मुरमाचा त्रास जास्त होतो. त्यातही उन्हाळ्यात याचे प्रमाण आणखी वाढते. मुरम कमी करण्याचा प्रयत्न केल्यास ते वाढतातही. म्हणूनच खाली दिलेल्या काही गोष्टींकडे लक्ष दिले तर मुरमाचा त्रास नक्की कमी होऊ शकतो.

* गुलाबपाणी आणि कापूर यांचे मिश्रण एका बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. मुरूम जेव्हा होतील, त्यावेळी कापसाने हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. हे केल्याने नक्कीच मुरूम कमी होतील.

* संपूर्ण चेहर्‍यावर मुरूम पसरले असतील तर हळद आणि कडुलिंबाची पाने एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि चेहर्‍यावर लावा. त्याने चेहरा स्वच्छ होईल. कारण लिंबाची पाने रोगप्रतिकारक असतात.

* उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते. प्रदुषणामुळे चेहरा काळा पडतो व नियमितपणे साफ न झाल्यामुळे मुरूम होतात. चेहर्‍याला स्वच्छ ठेवण्यासाठी बेसनात काकडीचा रस टाकून पेस्ट बनवून चेहर्‍याला लावल्याने चेहरा साफ व स्वच्छ होतो. हे फेस पॅकचे काम करतो.

* मुलतानी माती पाण्यामध्ये टाकून तिची पेस्ट बनवा. नंतर ती चेहर्‍यावर लावा. मुलतानी मातीला दह्यात मिसळूनही लावू शकतो. मुरमांवर हाही एक जालीम उपाय आहे.

* गरम पाण्यात हळद टाकून वाफ घेतल्याने चेहर्‍यावरील छिद्रे खुली होतात आणि चेहरा साफ होतो. मुरूम व्हायला त्यामुळे अटकाव होतो.

* तुळस व लिंबाच्या पानाची पेस्ट चेहर्‍यावर लावल्याने मुरूम होत नाही.

* पाण्यात चंदनाची पावडर टाकून चेहर्‍याला लावल्यास थंडावा मिळतो व चेहर्‍यावर तेज येते.

* गुलाबाच्या पाकळ्याची पेस्ट बनवून चेहर्‍यावर लावल्याने मुरूम कमी होतात.

* बोलसमच्या फुलांची पेस्ट लावल्याने चेहर्‍यावरचे मुरूम कमी होतात.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कढीपत्त्याचे रोप वारंवार सुकते? हिरवेगार आणि दाट ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा

बाहेरून लाल आणि गोड व रसरशीत सफरचंदं खरेदी करण्याच्या ५ टिप्स वाचा

हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हा' खास काढा; सर्दी-खोकला राहील दूर

तुमच्या 'स्मार्ट' मुलांसाठी 'स्मार्ट' रेसिपीस! बालदिनानिमित्त ५ झटपट आणि पौष्टिक नाश्ता प्रकार

World Diabetes Day 2026 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो, प्रकार, कारणे आणि उपचार जाणून घ्या

Show comments