Marathi Biodata Maker

सदाबहार वेशभुषा साडी

Updated: मंगळवार, 4 डिसेंबर 2012 (15:22 IST)

फॅशनचा सर्वांत महत्वाचा भाग वेशभुषा असून कित्येक नवीन प्रकारच्या वेशभुषा नित्य बदलत असतात तर काही पारंपारिक वेशभुषा नित्य टिकून असतात. त्यातील एक आहे साडी. साडी पारंपारिक असूनही ती सदाबहार आहे. विशेष म्हणजे ही अशी वेशभुषा आहे, जिचा आकार एक असूनही ती परिधान करण्याच्या मात्र अनेक पद्धती आहेत. जसे नऊवारी साडी, सरळ पदराची साडी, उलट्या पदराची साडी, बंगाली साडी, लहान साडी, पिनअप साडी, एकेरी पदराची साडी इत्यादी.

साडीमध्ये स्त्रीचे सौंदर्य अधिकच खूलून दिसते. स्त्री सडपातळ असो किंवा जाड. साडी प्रत्येक स्त्रीला शोभून दिसते. साडीच्या जशा अनेक पद्धती आहेत तशा अनेक डिझाइनही आहेत जसे साधी साडी, डिझाइनर साडी, बांधणी साडी, काठ पदराची साडी, जरीची साडी, तार्‍यांची साडी, इत्यादी.

पैठणी साडी तर साड्यांची महाराणी मानली जाते. त्यावरचे बारीक जरतारी नक्षीकाम, तसेच रंगसंगती प्रत्येक स्त्रीच्या मनास भुरळ घालणारी असते. आजकाल साडीवर अनेक पद्धतीचे नक्षीकाम करण्याची फॅशन आहे. जसे ऑफिशियल वापरासाठी किंवा नित्य उपयोगासाठी कॉटनच्या साडीवर फ‍ेब्रिक रंगाचे नक्षीकाम करु शकता. साडीवर पॅचवर्क करुनही आपण साडीची शोभा वाढवू शकता.

साध्या साडीच्या किनारीवर लेस लावून तसेच भरतकाम करुन तिचे सौंदर्य खूलवू शकता. हल्ली तर मशीनच्या सहाय्याने साडीवर एम्ब्रॉडरीचे छान नक्षीकाम करुन मिळते. सण समारंभासाठी साडीवर तार्‍यांचे, जरीचे, मोत्यांचे, काचाचे, क्रिस्टल मोती तसेच स्टोनचे वर्क करुन साडी भरजरी करु शकता.

संध्याकाळच्या समारंभात तार्‍यांचे किंवा मोत्यांचे नक्षीकाम केलेली साडी आपल्या सौंदर्यात भरच घालेल.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

तेनालीराम कहाणी : गोष्ट जादुई पाण्याची

आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि चवीला अप्रतिम असणारी 'जांभूळ स्मूदी'; एक उत्तम हेल्थ ड्रिंक

Ghost Lashes Trend डोळ्यांच्या मेकअपचा बदलता ट्रेंड: घरच्या घरी कसा मिळवाल 'घोस्ट लैशेज' लुक?

Lokmanya Bal Gangadhar Tilak Jayanti Abhivadan 2026 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

फक्त ३० सेकंदात ओळखा, समोरची व्यक्ती तुमच्यावर जळते का?

Show comments