Festival Posters

हसून दाखवा दात!

वेबदुनिया
NDND
मोहक हास्य सौंदर्यात भर घालत असते. गुलाबी गालांवर पडणारी खळी समोरच्या व्यक्तीला घायाळ केल्याशिवाय राहत नाही. हसण्याने सौंदर्य बहरते, पण मुळात दात खराब असतील तर? कितीही गोड हसून काही उपयोग आहे काय? सुंदर दिसण्यात मोहक हास्य जसे भर घालते, तसेच मोत्यांसारखे दातही आवश्यक आहेत.

गालावर हास्य कायम ठेवण्यासाठी आणि खुलविण्यासाठी दातांची काळजी घ्या. त्यासाठीच या टिप्स उपयुक्त ठरू शकतील.

* सौंदर्यवृध्दीसाठी दात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळे मेकअप करताना दातांचीही काळजी घ्या.
* चेहरा सतेज होण्यासाठी क्लीनअप किंवा फेशियल केले जाते. त्याचप्रमाणे दात व हिरड्यांही दिवसातून किमान दोन वेळा स्वच्छ केल्या पाहिजे.
* दात मोत्यांसारखे चकाकत राहण्यासाठी सकाळी व रात्री ब्रशच्या सहाय्याने नियमित स्वच्छ करा.
* दातांवर डाग पडतील, अशा वस्तू खाऊ नका. उदा. तंबाखू, गुटखा...
* सहा महिन्यातून किमान एकदा डेंटिस्टकडून दातांची तपासणी करून घ्या. तपासणीचे कारण दातांचा आजार एक-दोन दिवसात होत नाही. त्यामुळे नियमित तपासणी केल्याने त्रास होण्याआधीचा त्याच्यावर उपचार केले जाऊ शकतात.
* काही मुलांचे दुधाचे दातही लवकर खराब होतात. म्हणून अंगठा चोखणे, जीभ बाहेर काढून बोलणे आदी मुलांच्या सवयी बंद कराव्यात.
* दात स्वच्छ करण्‍यासाठी ब्रशिंग पध्दतही वापरता येते. तीन- चार महिन्यात ब्रश बदलावा. हार्ड किंवा मिडीयम ब्रश न घेता नेहमी सॉफ्ट ब्रिसल्सच्या ब्रशचा उपयोग करावा.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

ॲसिडिटीची भीती नाही! वटपौर्णिमेच्या उपवासासाठी बनवा हलका-फुलका आणि पौष्टिक फराळ

Birthday Wishes For Husband in Marathi पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

भाजी तिखट झाली तर नका काळजी करू; २ मिनिटांत चव सुधारतील या सोप्या ट्रिक्स

Bikini line Waxing बिकिनी लाइन वॅक्सिंगनंतर जळजळ किंवा टोचल्यासारखे वाटते ? या ५ पद्धतींने त्वचेची काळजी घ्या

आई-वडिलांनी मुलांशी कधीही बोलू नयेत ही ५ वाक्ये

Show comments