Marathi Biodata Maker

हिवाळा आणि तुमचे कपडे!

वेबदुनिया
सध्या हिवाळ्यामुळे गुलाबी थंडी पडू लागली आहे. हिवाळ्यात सगळ्यात मोठी समस्या उद्भवते ती म्हणजे कपड्याची. कितीही महागडे आणि फॅशनेबल कपडे परिधान केले तरी त्यांचा फारसा प्रभाव पडत नाही. कारण स्वेटरच्या खाली ते झाकले जातात. 

हिवाळ्यात येणार्‍या उबदार कपड्यांमधूनही आता फॅशन डोकावू लागली आहे. बोचणार्‍या थंडीपासून बचावासाठी नव्हे तर इतरापेक्षा आपण वेगळे दिसावे यासाठी महिला स्वेटर परिधान करीत असतात. उबदार कपड्यात महिला जाडसर दिसतात. त्यामुळे आपल्याला शोभेल व थंडीही वाजणार नाही, असे उबदार कपडे त्या शोधत असतात.

महिलांसाठी काही टिप्स-
हिवाळ्यात तुम्हाला तुमचा आवडता स्कर्ट परिधान करायचा असेल तर पाय झाकण्यासाठी स्टॉकिंग्ज घाला. यामुळे तुमच्या पायांचे थंडीपासून रक्षण होइल व तुम्ही ‍स्लीम व सुंदर दिसाल.
नेहमी आपल्या फिगरनुसार उबदार स्वेटर किंवा जॅकेट खरेदी करा. परंतु जास्त सैल अथवा तंग घेऊ नका.
हिवाळ्यात थर्माकोट परिधान करणे फायदेशीर असते. कारण त्याने तुम्हाला थंडीची तीव्रता कमी जाणवेलच परंतु, आपले स्टाइल स्टेटमेंटही कायम राखता येईल.

हिवाळ्यातील उबदार कपडे देखील तुम्ही फॅशनेबल बनवू शकतात. हायनेक स्वेटर व कोट यांच्यासोबत रंग-बिरंगी मफलर, मोत्यांची लांब माळ, ब्रेसलेट आदी 'ट्राय' करून 'डिफरंट लूक' देऊ शकतात.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

Okra Recipes : डिनरमध्ये भेंडीच्या या स्वादिष्ट रेसिपीज नक्की ट्राय करून पहा

मधुमेह रुग्णांनी रोज आल्याचे सेवन का करावे? जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे

M.Phil in Sociology: समाजशास्त्रात एम.फिल करून घडवा उज्ज्वल करिअर!

पावसाळ्यात केस गळणे टाळण्यासाठी हे सोपे उपाय अवलंबवा

कुरकुरीत राजस्थानी मिरची वडा; पावसाळ्यात एक उत्तम नाश्ता

Show comments