पायांची काळजी कशी घ्याल! दिवसभर उभं राहून पाय शिणले असतील तर गरम पाण्यात थोडं मीठ घालून त्या पाण्यात पाय बुडवातवेत. थकवा जातो.
गरम व गार पाण्याचे छोटे टब करून एकदा गरम व नंतर गार पाण्यात असं आलटून पाय ठेवल्यासही आराम वाटतो.
पायाला प्यूमिक स्टोन किंवा वजरीने घासून धुऊन मग कोरडे करून क्रीम लावल्यास पाय मऊ राहतात. भेगांसाठी खास क्रीम मिळतात ती लावावीत. शक्यतो पायात मोजे घालून ठेवावते. कोकमतेलाचाही वापर भेगांसाठी चांगला असतो.
पायाला वास येऊ नये म्हणून टाल्कम पावडर किंवा बेबी पावडर पायांवर शिंपडावी.
आपल्या पायाच्या आकाराला योग्य व सुखदायी वाटेल अशी चप्पल किवा बूट याची निवड करावी.
पोहण्याच्या तलावावर असलेल्या बाथरूम्समध्ये अनवाणी चालण्याने बर्याच वेळा चिखल्या होतात. त्यासाठी सूक्ष्मजीविरोधी मलम लावावे. चिखल्या पूर्ण बर्या झाल्यावरही काहीदिवस मलम लावावे लागते.
चिखल्या होऊ नयेत म्हणून पाय बुटात सतत ठेवू नयेत. पाय स्वच्छ व कोरडे ठेवावेत. पायांसाठी मिळणारी पावडर त्यासाठी वापरावी.