Daily Horoscope
✕

ओळखा बघू काय ?

Updated: शनिवार, 10 एप्रिल 2021 (10:58 IST)
 
७. सुपभर लाह्या, मधे रुपय्या = चांदण्या व चंद्र
 
८. घाटावरून आला भट, त्याचा काष्टा घट = कांदा
 
९. आकाशातून पडली घार, रक्त प्याले घटाघटा, मांस खाल्ले पटापटा = शहाळे/नारळ
 
१०. एवढसं पोर, घर राखण्यात थोर = कुलूप
 
११. एवढीशी बेबी, चुलीपुढे उभी = फुंकणी 
 
१२. तार तार तारले, विजापूर मारले, बारा वर्षे तप केले, हाती नाही लागले = उंबराचे फुल
 
१३. पाऊस नाही, पाणी नाही, रान कसं हिरवं, कात नाही, चुना नाही, तोंड कसं रंगलं = पोपट
 
१४. लहानसे झाड, त्याला इवलासा दाणा, गरज पडली की धावत जाऊन आणा = ओवा
 
१५. जांभळा झगा अंगावर, मुकुट घालते डोक्यावर = वांगे
 
१६. अटांगण पटांगण, लाल रान, बत्तीस पिंपळांना एकच पान = जीभ
 
१७. हरण पळतं, दूध गळतं = दळणाचे जाते
 
१८. आठ तोंडे, जीभ नाही, गाणे मात्र सुरेल गाई = बासरी
 
१९. काळी गाय, काटे खाय, पाण्याला बघून उभी ऱ्हाय = चामड्याची वहाण/चप्पल
 
२०. वीस लुगडी, आतून उघडी = मक्याचे कणीस
 
२१. सरसर गेला साप नव्हे, गडगड गेला गाडा नव्हे, गळ्यात जानवे ब्राह्मण नव्हे = पाण्याचा रहाट

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

Durga Ashtami 2026 Wishes in Marathi दुर्गा अष्टमी शुभेच्छा संदेश

ब्रेडपासून बनवा ५ झटपट आणि चविष्ट पाककृती

संत साहित्य आजही का महत्त्वाचे आहे? दैनंदिन जीवनाशी जोडलेले विचार

"नवरात्रीच्या उपवासासाठी साखरपाकाची खीर नको? बनवा मखान्याची स्वादिष्ट आणि पौष्टिक खीर''

पोटातील गॅस आणि पोटफुगीचा त्रास कमी करण्यासाठी ५ प्रभावी उपाय; जाणून घ्या सोपे मार्ग!

पुढील लेख
Show comments