शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

प्रेमात यश मिळविण्यासाठी 21 सोपे उपाय

प्रेम पवित्र आणि खरी भावना असते. प्रेम हे आकर्षण आणि वशीकरणाहून किती तरी पट शुद्ध भावना आणि पवित्र असतं. आपलं ही प्रेम निर्मळ असेल तर हे उपाय आपल्यासाठी आहे. जे लोकं जबरजस्तीने समोरच्याला वशीकृत करू इच्छित असतील त्यांच्यासाठी हे प्रभावी नाही.
1 देवाकडे निर्मळ मनाने आपल्या प्रेमासाठी प्रार्थना केली पाहिजे.
2 प्रभू विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो समोर शुक्ल पक्षात गुरुवारी ॐ लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राने 3 माळ जपाव्या. 3 महिन्यापर्यंत दर गुरुवारी मंदिरात प्रसाद चढवावा.
3 श्रीकृष्णाच्या मंदिरा बासुरी आणि पान अर्पण केल्याने प्रेमाची प्राप्ती होते.
4 कोणालाही आपलंसं करायचं असेल तर देवी दुर्गांची पूजा करावी. देवीला लाल रंगाची ध्वजा चढवावी आणि प्रेमात यश मिळावे अशी प्रार्थना करावी.
5 मधाने रुद्राभिषेक केल्याने इच्छित प्रेम मिळतं.
6 सोळा सोमवार केल्याने योग्य, सुंदर, सुशील आणि प्रेमळ जीवन साथीदार मिळतं.
7 प्रेम- विवाहात यश मिळावे यासाठी शुक्ल पक्षात प्राण प्रतिष्ठित गौरी शंकर रुद्राक्ष धारण करावे.

8 ओपल किंवा हिरा रत्न धारण केल्याने प्रेम संबंध विवाह पर्यंत पोहचण्यात मदत मिळते.
9 जर प्रेमी-प्रेमिकेतून एक कोणी मांगलिक आहे आणि त्यामुळे विवाह बाधा येत असेल तर मंगल दोष निवारण केल्याशिवाय विवाह करण्याचा विचार करणे योग्य नाही. विवाहापूर्वी लाल वस्तू दान कराव्या.
10 सप्तमेश किंवा सप्तम भावामध्ये विराजित ग्रह शांती अवश्य करवावी.
11 एकमेकाला टोकदार वस्तू भेट म्हणून देऊ नका. याने संबंध बिघडण्याची शक्यता वाढते.
12 भेट म्हणून काळ्या रंगाची वस्तू एकमेकाला देऊ नये. याने दुरी वाढते.
13 आपल्या प्रेमी/प्रेमिकाला हिरा भेट करणे शुभ आहे. हिर्‍याऐवजी अमेरिकन डायमंडही देऊ शकता परंतू त्याचा रंग काळा किंवा निळा नसावा.
14 लाल, गुलाबी, पिवळा आणि गोल्डन यलो रंगाच्या वस्तू भेट म्हणून देणं अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे.
15 मुलींना आपल्या हातात हिरव्या बांगड्या आणि प्रत्येक गुरुवारी पिवळे आणि शुक्रवारी पांढरे वस्त्र धारण करावे.
16 मुलाला प्रेम यश मिळवायचे असेल तर पन्नाची अंगठी धारण करावी याने प्रेमिकाच्या मनात सदैव आकर्षण राहतात.
17 प्रेमी युगलाने शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी भेटू नये. या दिवशी भेटल्याने आपसात वाद निर्माण होण्याची शक्यता असते.
18 प्रियकर आणि प्रेमिकाने शुक्रवार आणि पूर्णिमाच्या दिवशी भेटायला हवं. ज्या पूर्णिमेला शुक्रवार असेल तो दिवस तर अत्यंत शुभ मानला आहे. या दिवशी आपसात प्रेम आणि आकर्षण वाढतं.
19 पांढरे वस्त्र धारण करून एखादा धार्मिक स्थळावर लाल गुलाब आणि चमेलीचे अत्तर अर्पित करून आपल्या प्रेमाला यश मिळावे अशी प्रार्थना करावी.
20 काम व आकर्षण बीज मंत्राचे जप करावे. मंत्र: ॐ क्लीं नम:। 
21 राधा-कृष्णाची फोटो किंवा मूर्ती समोर बसून किंवा एखाद्या मंदिर जाऊन आपल्या प्रियकर किंवा प्रेमिकेला मनात ठेवून ॐ क्लीं कृष्णाय गोपीजन वल्लभाय स्वाहा: या मंत्राचा 108 वेळा जप करावा. प्रत्येक शुक्रवारी राधा-कृष्णाच्या मंदिरात जाऊन, त्यांचे दर्शन करावे, फूल-हार चढवावे, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. याने प्रेम विवाह येत असलेले अडथळे दूर होतील आणि यश मिळेल.