गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : मंगळवार, 19 जुलै 2022 (09:09 IST)

फार भाग्यवान असतात हे माणसं

shani parvat
मध्यमा बोटाच्या खाली शनी पर्वताची जागा आहे. मुख्य गोष्ट म्हणजे शनी पर्वत फारच भाग्यशाली माणसांच्या हातात विकसित होतो. शनी ग्रहाने प्रभावित माणसाची उंची असामान्य रूपेण जास्त असते. त्यांचे शरीर संगठित असत, पण डोक्यावर केस कमी असतात. लांब चेहर्‍यावर अविश्वास आणि शंकेने भरलेले त्यांचे लहान डोळे नेहमी उदास असतात.   
 
पूर्ण विकसित शनी पर्वत असणारा मनुष्य प्रबल भाग्यवान असतो. असे मनुष्य जीवनात आपल्या प्रयत्नांमुळे जास्त प्रगती करतात. शुभ शनी पर्वत प्रधान मनुष्य इंजिनियर, वैज्ञानिक, जादुगार, साहित्यकार, ज्योतिषी,
कृषक आणि रसायन शास्त्री असतात. शुभ शनी पर्वत असणारे स्त्री-पुरुष सामान्य रूपेण आपल्या आई वडिलांची एकुलतीएक संतानं असते. त्यांच्या जीवनात प्रेम सर्वोपरि असत. म्हातारपणापर्यंत प्रेमात त्यांचा रस असतो. ते स्वभावाने संतोषी आणि कंजूश असतात.