आपल्या समाजात 'सेक्स'विषयी एखाद्या महिलेने खुलेपणाने बोलले, ती महिला चांगल्या वर्तवणुकीची नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे आपण कितीही पुढारले असलो तरी 'सेक्स' संदर्भात भारतीय महिलांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न, द्विधा आहेत. लग्न होऊन ही आपल्या पतीशी....
थकवा जाणवणे- महिलांनी 'चूल आणि मूल' ही चौकट केव्हाच ओलंडलीय. जॉब करत असताना महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असते. त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक थकवा येत असतो. या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या सेक्स लाइफवर होत असतो. तणावात वावरत असणार्या महिला सेक्समध्ये जास्त रूची घेत नाहीत. याशिवाय सेक्सबाबत नाराज होणे, प्रेग्नंसीची भीती व त्यापासून होणार्या त्रासापासून त्या नेहमी दूर पळताना दिसतात.
अशा स्थितीत आपल्या पार्टनरला हळूच बाहुपाशात घेऊन तिच्या मनातील भीती काढावी. आपण तिच्यासाठी काय स्पेशल करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. पार्टनरमध्ये सेक्स भावना जागृत करण्यासाठी सेक्स मसाजचा वापर करू शकता.
न्यूनगंड (कमीपणा)- सेक्स करण्याआधी महिलांना त्याविषयी भीती तर वाटते. त्यापेक्षा त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होते. काही महिलांना आपल्या 'पार्टनर'समोर लाइट चालू असताना कपडे उतरवण्यात लज्जा, कमीपणा वाटत असतो. सेक्स झाल्यानंतर लगेच काही महिलांना कपडे घालायची घाई होते. टीव्हीवर अशा प्रकारच्या घटना पाहून त्याच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड तयार झालेला असतो. तसेच सेक्स करत असताना आपल्या जोडीदाराकडून मिळणारी हीन वागणूक त्यांच्या मनात सेक्सविषयी गैरसमज निर्माण करत असतात.
अशावेळी आपल्या पार्टनरसोबत जास्तीत जास्त काळ घालविला पाहिजे. पार्टनरचे मन जिंकणे, ही प्रणयक्रीडेतील पहिली पायरी आहे. त्यासाठी पार्टनरमध्ये प्रत्येक गोष्टी पारदर्शकता असणे आवश्यक असते. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्या सेक्स लाईफवर पडत असतो.
आहार- ' सेक्स ड्राइव्ह' वाढविण्यासाठी आपल्या आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. 25 वर्षांच्या एका तरूणीने लग्नाआधी वजन कमी करण्यासाठी खूप डाएटिंग केले. लग्नापर्यंत ती अतिशय स्लिम होऊन गेली. मात्र लग्न झाल्यानंतर सेक्समध्ये तिची रुची कमी झाल्याचे निदर्शनात आले. नियमित आहारामुळे आपला सेक्स स्टॅमिना वाढत असतो. चॉकलेट हे 'मूड लिफ्टर्स'चे कार्य करत असतात. त्यामुळे पार्टनरला चॉकलेट खाण्यास द्यावीत. बटाट्याचे चिप्स ऐवजी काकडीचा सलाद फायदेशीर ठरतो.
औषधांवर लक्ष ठेवा- भीती, तणाव व डिप्रेशन दूर करण्यासाठी महिला काही औषधांचे सेवन करत असतात. त्यामुळे सेक्समधील त्यांची रुची कमी होत असते. पाळणा लांबविणार्या गोळ्यांचा ही सेक्स जीवनावर विपरित परिणाम होत असतो. अशा प्रकारची औषधे आपल्या पार्टनरला घेऊ देऊ नये. त्यांना योग्य डॉक्टरच्या मार्गदर्शनाची गरज आहे, हे ओळखावे.
आपल्या समाजात 'सेक्स'विषयी एखाद्या महिलेने खुलेपणाने बोलले, ती महिला चांगल्या वर्तवणुकीची नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे आपण कितीही पुढारले असलो तरी 'सेक्स' संदर्भात भारतीय महिलांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न, द्विधा आहेत. लग्न होऊन ही आपल्या पतीशी 'सेक्स'संदर्भात महिला बोलू पावत नाही. आपल्या 'पार्टनर'ला सेक्सचे किती ज्ञान आहे, हे सेक्स करण्यापूर्वी जाणून घेऊन त्याच्या मनातील त्याविषयी असलेली भीती, गैरसमज दूर केले पाहिजेत. आपल्या 'पार्टनर'शी जोर जबरदस्ती न करता प्रेमाने जमवून घेतले तर आपल्या सेक्स लाइफमध्ये कधीच वादळ येणार नाही व तुम्हाला व तुमच्या पार्टनर सेक्सचा खर्या अर्थाने आनंद घेता येईल.