Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्तनपानाशी संबंधित 7 अशा गोष्टी ज्या जाणून घ्यायलाच हव्यात

Updated: रविवार, 6 ऑगस्ट 2023 (15:20 IST)
 
थोडा त्रास होणं सामान्य गोष्ट आहे. आणि पहिल्यांदाच आई होणाऱ्या स्त्रियांना स्तनपानाची सवय होण्यासाठी थोडा वेळ लागतो.
 
पण यामुळे खूप वेदना आणि अस्वस्थता जाणवत असेल तर डॉक्टर, नर्सचा सल्ला घ्यावा.
 
समज 2 : जर एखाद्या आईने लगेचच स्तनपान केलं नाही, तर त्या नंतर आपल्या बाळाला दूध पाजू शकणार नाहीत
यावर प्राध्यापक अ‍ॅलिस्टर सुटक्लिफ सांगतात, अशी कोणतीही गोष्ट जी आईला तिच्या मुलाला स्तनपान करण्यास प्रोत्साहित करेल ती गोष्ट आरोग्यासाठी चांगली असते.
 
मानवी वर्तनावर कोणत्याही प्रकारचं बंधन लादणं किंवा वेळेची कोणतीही कठोर अट ठेवणं हे विज्ञानाला धरून नाही.
 
पण बाळाच्या जन्मानंतर लगेचच त्याला स्तनपान केल्यास अनेक फायदे मिळतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे बाळाला त्वरित पोषण मिळते.
 
दुसरं म्हणजे, यामुळे गर्भाशयाची आकुंचनाची प्रक्रिया देखील सुरू होते. बाळंतपणानंतर गर्भाशयातून जो रक्ताचा प्रवाह सुरू असतो तो थांबण्यास मदत होते.
 
याव्यतिरिक्त बाळाच्या जन्माच्या काही दिवस आधी आईच्या शरीरात कोलोस्ट्रम नावाचा विशेष प्रथिनयुक्त पदार्थ तयार झालेला असतो. यामुळे आईला दूध येण्यास मदत होते.
 
समज 3: स्तनपान करत असल्यास आई कोणतंही औषध घेऊ शकत नाही
यावर प्राध्यापक कॅट्रिओना वाएट सांगतात की, जगभरातील प्रत्येक आईचा एकच प्रश्न असतो की, मी घेतलेलं एखादं औषध माझ्या बाळासाठी सुरक्षित असेल ना?
 
वस्तुस्थिती अशी आहे की आई जर एखादं औषध घेत असेल तर त्यातील काही औषधंच अशी आहेत जी अगदी थोड्या प्रमाणात आईच्या दुधावाटे बाळापर्यंत पोहोचतात. जर डॉक्टरांनी एखादं औषध घ्यायला सांगितलं असेल तर तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारू शकता.
 
परंतु, साधारणपणे अशी औषधं मुलांसाठी हानिकारक नसतात. बाळाची सर्वात मोठी गरज असते ती म्हणजे एक निरोगी आई. संसर्ग, नैराश्य किंवा वेदनांसाठी असलेली बहुतेक औषधं मुलांसाठी सुरक्षित असतात.
 
काहीच अशी औषधं आहेत जी स्तनपानादरम्यान घेऊ नयेत. यापैकी बहुतेक औषधं कर्करोगासारख्या काही गंभीर आजारांच्या उपचारांसाठी दिली जातात.
 
इतर काही औषधं देखील आहेत. पण स्तनपानापूर्वी त्याचे फायदे- तोटे समजून घेतले पाहिजेत.
 
एखादी आई स्तनदा माता असेल तर आणि तिला एखादं औषध घेण्यास सांगितलं असेल तर ते औषध लिहून देणाऱ्या डॉक्टरांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार तिला असायला हवा.
 
स्तनपान करताना काळजी घ्यायला हवी अशी औषध मूळात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळत नाहीत. आणि सर्दी तापावरची औषधं त्या तुलनेत सुरक्षित असतात.
 
पण या औषधांमुळे आईच्या दुधात कमतरता येऊ शकते
 
आणि जर वनौषधीपासून तयार केलेल्या औषधांबद्दल काही माहिती नसेल तर त्याबाबत नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण त्यात कोणते घटक मिसळलेले असतात याची माहिती नसते. अशी अनेक औषधं संशोधनाशिवाय तयार केली जातात.
 
समज 4 : स्तनपान करण्यापूर्वी साधं अन्न खावं, मसालेदार अन्न टाळावं
यावर प्राध्यापक कॅट्रिओना वाएट सांगतात की, तुमच्या बाळाला दूध पाजण्यापूर्वी तुम्ही अमुक तमुक खाऊ नये असं काही नसतं. मात्र, तुम्ही जे खात आहात त्याचा तुमच्या दुधावरही परिणाम होतो.
 
बऱ्याच प्रकरणांमध्ये आईचा एक पॅटर्न पाहायला मिळाला आहे. माझ्या एका मुलाला स्तनपान करताना माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी संत्र्यासारखा आंबट रस प्यायचे तेव्हा तो खूप चिडचिड करायचा.
 
विशिष्ट प्रकारचं अन्न खाल्ल्यानंतर तुमचं बाळ वेगळ्या पद्धतीने वागतं हे तुम्हाला जाणवेल. कदाचित ते तुमच्या खाण्यापिण्याशी संबंधित असेल. पण असं कोणतंही अन्न नाही जे तुम्ही स्तनपानादरम्यान खाऊ शकत नाही. नाहीतर ते तुमच्या मुलासाठी हानिकारक ठरू शकतं.
 
समज 5 : जर तुम्ही स्तनपान करत असाल तर बाळाला वरचं दूध पाजता येत नाही.
यावर प्राध्यापक कॅट्रिओना वाएट सांगतात की, हा कोणता सिद्धांत नाहीये की जो तुम्ही पाळलाच पाहिजे. आईच्या स्तनातील दूध हे मागणी आणि पुरवठ्यावर तयार होत असतं. कोणत्याही स्त्रीच्या शरीरात खूप विलक्षण गुण असतात, ज्यामुळे तिच्याकडे तिच्या मुलाच्या गरजेसाठी पुरेसं दूध असतं.
 
जेव्हा बाळ स्तनाग्र चोखतं तेव्हा आईच्या शरीरातून काही हार्मोन्स बाहेर पडतात, जे बाळाला आवश्यक असलेलं दूध तयार करतात. म्हणूनच जरी तुम्ही अगदी लहान बाळाला स्तनपान करत असाल किंवा मोठ्या बाळाला स्तनपान करत असाल किंवा जुळ्या मुलांना स्तनपान करत असाल तरी आईच्या शरीरात पुरेसं दूध तयार होत असतं.
 
जर तुम्ही बाळाला वरचं दूध पाजायला सुरुवात केली तर तुमच्या शरीराला हार्मोन्सचे संकेत मिळणार नाहीत. तुमच्या बाळाला दुधाची जास्त गरज आहे हे तुमच्या शरीराला कळणार नाही.
 
फोटो स्रोत,GETTY IMAGES
जर तुम्हाला पुरेसं दूध येत नसेल आणि तुम्ही बाळाला वरचं म्हणजे फॉर्म्युला दूध पाजण्यास सुरुवात केलीत, तर तुम्हाला त्याक्षणी बरं वाटेल, पण नंतर यामुळे समस्या उद्भवू शकतात.
 
दुसरीकडे जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल, तुम्ही थकलेले असाल किंवा आजारी असाल तर तुम्ही तुमच्या बाळाला वरचं दूध पाजू शकता. पण याचा अर्थ असा नाही की त्यानंतर तुम्ही बाळाला तुमचं दूध पाजूच शकत नाही.
 
समज 6: जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान करू नये
प्राध्यापक अ‍ॅलिस्टर सुटक्लिफ सांगतात, हा एक गैरसमज आहे. एकच परिस्थिती असते ज्यामध्ये आई आपल्या मुलाला दूध पाजू शकत नाही आणि ती म्हणजे जेव्हा तिला एचआयव्ही किंवा हिपॅटायटीसची लागण झालेली असते. हे विषाणू दुधातून बाळाच्या शरीरात जातात.
 
बहुतेक आजारांदरम्यान मुलांना आईचं दूध पाजण्यात कोणतीही अडचण येत नाही. कारण आजारपणात आईच्या शरीरातून अँटीबॉडीज बाहेर पडत असतात, ज्यामुळे तिच्या नवजात बाळाचंही संरक्षण होतं. असं क्वचितच घडतं की आईचा आजार बाळालाही होतो.
 
समज 7: जर तुम्ही एका वर्षापेक्षा जास्त वेळ स्तनपान करत असाल तर तुमच्या बाळाची ही सवय सोडवणं कठीण होतं
प्राध्यापक कॅट्रिओना वाएट सांगतात की, जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलीय त्याप्रमाणे बाळाला जन्मानंतर सहा महिने स्तनपान करावं.
 
यानंतर त्याला इतर पोषक तत्वं द्यायला सुरुवात करावी. पण, या काळात आईने आपल्या मुलाला हवं तेवढं स्तनपान करायला हरकत नाही. स्तनपान नेमकं केव्हा थांबवावं याबद्दल तज्ञ कोणताही सल्ला देत नाही.
 
ब्रिटन सारख्या उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये एक ते दोन वर्षातच मुलांचं दूध सोडवलं जातं. तर युगांडासारख्या कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये माता आपल्या मुलांना तीन तीन वर्ष दूध पाजतात.
 
पण जागतिक अडचण सांगायची तर डब्ल्यूएचओने शिफारस करून देखील अनेक देश स्तनदा मातांना पुरेशी प्रसूती रजा देत नाहीत.
 






Published By- Priya Dixit
 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पावसाळ्यात त्वचेची चमक आणि ताजेपणा टिकवण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती टोनर!

पावसाळ्यात मुलांसोबत घेऊन सहलीला जाण्याचा विचार करत आहात का? प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

तेनालीराम कहाणी : एक अनोखी कल्पना

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलांसाठी बनवा Healthy Tricolor Chaat Recipes

Pocketing Relationship: नक्की काय आहे 'पॉकेटिंग' हा रिलेशनशिप ट्रेंड आणि त्याची ४ प्रमुख लक्षणे

पुढील लेख