Dharma Sangrah

सुकामेवा खाण्याने आयुर्मानात वाढ

वेबदुनिया
रोजच्या रोज मूठभर सुकामेवा खाणार्‍यांमध्ये 30 वर्षात कोणत्याही आजाराने मरण्याच्या शक्यतेत 20 टक्क्यांनी घट झाल्याचे एका संशोधनात आढळले आहे. ज्यांचे सुकामेवा खाण्याचे प्रमाण अगदीच कमी असते त्यांच्यापेक्षा खाणार्‍यांच्या मृत्युदरात घट झाल्याचे परीक्षणातून जाणवले. या परीक्षणात मृत्यूच्या ठराविक कारणांवर होणारा संरक्षणात्मक प्रभावही पडताळण्यात आला आहे.

अमेरिकी संशोधकांच्या एका पथकाने एक लाख 20 हजार व्यक्तींवर तब्बल 30 वर्षे अभ्यास केला. त्यापैकी सुकामेवा खाणार्‍या व्यक्तींचा मृत्युदर 20 टक्क्यांनी घटल्याचे निदर्शनास आले. सुकामेवा खाल्लने हृदयविकारामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण 29 टक्क्यांनी कमी झाले आहे, तर कर्करोगामुळे होणारे मृत्यूही 11 टक्के कमी झाले आहेत, असे निरीक्षण डाना-फॅबर कॅन्सर इन्स्टिटय़ूट आणि ब्रीगम अँण्ड वूमन्स रुग्णालयाचे मुख्य संशोधक डॉ. चाल्स फच यांनी नमूद केले. मात्र, सुकामेव्यातील कोणत्या प्रकारचा किती संरक्षणात्मक प्रभाव पडू शकतो हे अद्याप निर्धारित करता आलेले नाही. शेंगदाणे आणि काजूंचा आयुर्मानात वाढ होण्यात चांगल्या प्रमाणात प्रभाव होतो. पण, त्याचबरोबर अक्रोड, बदाम, ब्राझीलियन बदाम, अंजीर यांचाही बर्‍या प्रमाणात संरक्षणात्मक प्रभाव पडतो. मात्र, त्याचे निश्चित प्रमाण कळू शकलेले नाही.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

भारतीयांचा आवडता नाश्ता, पण डॉक्टर का देतात टाळण्याचा सल्ला जाणून घ्या

पावसाळ्यात गुलाबाच्या रोपांना काळ्या ठिपक्यांच्या बुरशीपासून वाचवण्याचे प्रभावी उपाय

AI मुळे पुढील 5 वर्षांत सर्वाधिक मागणी असणाऱ्या 10 नोकऱ्या

पार्वती जयंती 2026: मुलींसाठी पार्वती देवीच्या नावावरून ठेवा ही 31 सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

साबुदाणा खिचडी नाही! यंदा आषाढी एकादशीला बनवा स्वादिष्ट रताळ्याचे कटलेट

पुढील लेख
Show comments