suvichar
✕

मधुमेह आणि वंध्यत्व

Updated: गुरूवार, 23 मार्च 2023 (17:11 IST)
 
मधुमेहामुळे पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन आणि रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन सारख्या समस्या दिसून येतात. याचा परिणाम केवळ लैंगिक आरोग्यावर होत नाही, तर थेट प्रजननक्षमतेवरही होतो.
 
अशा प्रकारामध्ये शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते, ज्यामुळे पुरुषांच्या वीर्यामध्ये डीएनए विखंडन पातळी अनियंत्रित होऊ शकते.
 
प्रकार १ चा मधुमेह असलेल्या स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी सामान्य गोष्ट झाली आहे. तर प्रकार २ च्या मधुमेहाने ग्रस्त महिलांना PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) आणि लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. मधुमेह असलेल्या गरोदर स्त्रियांमध्ये गर्भपात आणि मृत जन्मासारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय नवजात बालकामध्ये गुंतागुंत आणि अतिरिक्त वजन होण्याची शक्यता असते.
 
नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैलीचे पथ्य आणि सकस आहाराचे सेवन करून तसेच तंबाखूसारख्या पदार्थांपासून दूर राहून तुम्ही आपले वजन नियंत्रित ठेवू शकतात. भविष्यात मधुमेहला प्रतिबंध करने महत्वाचे झाले आहे.
 
मधुमेह आणि गर्भधारणा
जीवनशैलीतील बदल आणि अन्य कारणांमुळे आज मधुमेहाचे निदान झालेल्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. गर्भधारणेदरम्यान GTT (Glucose Tolerance Test) द्वारे हे तपासले जाऊ शकते. ज्या स्त्रिया खूप लठ्ठ आहेत आणि ज्यांच्या घरी मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांना मधुमेह असू शकतो. तसेच वारंवार लघवी होणे, थकवा येणे ही मधुमेहाची सामान्य लक्षणे असू शकतात.
 
यावर वेळीच नियंत्रण न केल्यास गर्भधारणा गुंतागुंतीची होऊ शकते. गर्भपात, अकाली जन्म, बाळाचे अतिरिक्त वजन आणि मृत जन्म, जन्म दोष यासारख्या समस्या असू शकतात. याशिवाय प्रकार २ च्या मधुमेहामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतो.
 
प्रसूतीनंतर गर्भधारणेचा मधुमेह निघून तर जातो, पण भविष्यात अश्या महिलांना प्रकार २ चा मधुमेह होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी नवजात बाळकांच्या मातांनी सकस आहार घेणे, हलका व्यायाम करणे आवश्यक आहे. यासोबतच, तुमच्या रक्तातील साखरेची पातळीचे निरीक्षण करणे, आणि गर्भधारणेदरम्यान बाळाच्या विकासाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
Dr Hrishikesh Pai 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

पोषक तत्वांनी समृद्ध आणि पचायला सोपी; केळी लहान मुलांसाठी खूप फायदेशीर

बाजारचा केमिकलमुक्त लसूण कशाला हवा? घरच्या घरी लसूण उगवण्याची सर्वात सोपी पद्धत!

Beauty Tips: वधूच्या मेकअप किटमध्ये या पाच लिपस्टिक शेड्सचा आवर्जून असायलाच हवा

भाजीला काही नसेल तर १० मिनिटांत बनवा झणझणीत 'हिरव्या लसणाचा ठेचा'

नैतिक कथा : प्रेम आणि जबाबदारी....गोष्ट इवल्याश्या मासोळीची

पुढील लेख
Show comments