Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पालेभाज्यांचे औषधी उपयोग

Updated: शनिवार, 3 डिसेंबर 2016 (14:17 IST)
चाकवत :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे. 
 
हादगा :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो.  
अळू  :-  याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते.  
अंबाडी :-  मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो. 
घोळ :-  मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते.  
 
टाकळा :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे.  
मायाळू :-  अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात. 
 
तांदुळजा :-  बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते.
मेथी :-  सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो. 
शेपू ;-  वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे. 
शेवगा ;-  ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात.  
सॅलड :-  या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्‍यांनी नियमित सॅलड खावे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Janmashtami Essay 2026 जन्माष्टमी निबंध

अतिशय चवदार आणि चमचमीत भाजी ''कढाई मशरूम'' पराठ्यासोबत अप्रतिम लागते

रोज रात्री उशिरा जेवता? डॉक्टरांचा हा महत्त्वाचा सल्ला दुर्लक्षित करू नका

बीटेक इन मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता पगार जाणून घ्या

डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करायची? कॉफी Ice Cubes ठरतील फायदेशीर

पुढील लेख
Show comments