suvichar

आरोग्यदायी बेलफळ

Updated: शुक्रवार, 4 एप्रिल 2008 (16:41 IST)
ND
लक्ष्मीच्या हातातून बिल्वाची (बेल) उत्पत्ती झालेली आहे. लक्ष्मीच्या हातातून उत्पत्ती झाल्यामुळे कदाचित बेल ाला ' श्रीफळ' नाव मिळाले असावे. संस्कृतातील 'बिल्व' नेहमीच्या भाषेत बेल तसेच बिलूच्या नावाने प्रसिध्द आहे. बेलफळाला श्रीफळ संबोधले जाते तर बेलपत्राला 'श्रीपत्र' आणि वृक्षाला 'श्रीवृक्ष' संबोधिले जाते. लिंगपुराणात बिल्वपत्रात लक्ष्मीचा वास असल्या संदर्भात कदाचित त्याचमुळे म्हटले असावे.

बिल्वपत्रे स्थिता लक्ष्मीदेवी लक्षणसंयुता ।

पवित्र मानले जाणार्‍या वृक्षांमध्ये बेलाचे वृक्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत. बेलपत्राशिवाय महादेवाचीही पूजा होऊ शकत नाही. घरासमोर, शेतात, मंदिरात हे वृक्ष लावले जातात. हे झाड आपोआप उगवले तर तो शुभ संकेत मानला जातो.

श्रीफलपत्रै: सफलैधू पंदद्यात् तथाऽगुर ूम्

वैदिक आर्यांनी देखील बेलवृक्षातील औषधी गुण हेरले होते. बेलफळाचे वर्णन आपल्याला जागोजागी मिळते. बिल्वालाही उपकारी मानले जाते. ' महान्वै भद्रो बिल्वो महान् भद्र उदुंबर अथर्ववेद'. महान पुरूष बेलफळासमान उपकारी असतो. बिल्वाला महान आणि भद्र अर्थात सज्जन-दुसर्‍यांची मदत करणारा, कोणाच्याही प्रती वाईट भावना न ठेवणारा मानले जाते. कमी पाणी असणार्‍या क्षेत्रातही कोणाच्याही संरक्षण आणि परिश्रमाशिवाय स्वत: उगणारा हा वृक्ष खर्‍या अर्थाने सेवक आहे. मनुष्य आणि पशू-पक्षी दोघांना भोजन प्रदान करतो. भोजनही असे की जे मधुर आहे, कल्याणकारी आहे, औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. या वृक्षाच्या स्तुतीत जे लिहिले गेले किंवा लिहिले जाईल ते कमीच ठरेल अशी या वृक्षाची किमया आहे.

या वृक्षाचे फळ गोल असते. या फळाची बाहेरची त्वचा लाकडासमान मजबूत असते. डिसेंबर-जानेवारीत पाने गळल्यानंतर फ्रेब्रुवारीत नवीन पानांसोबत लहान लहान श्वेत पुष्प फुलतात. हीच फुले नंतर लहान-लहान टणक गोल फळांमध्ये परिवर्तित होतात. मे महिन्यात फळे पिकण्यास सुरुवात होते आणि ही प्रक्रिया काही महिन्यांपर्यंत चालते. बर्‍याचदा तोडली न गेलेली फळे तीन पाव ते एक- दोन किलो वजनापर्यंत जड होतात.

वृक्षाच्या पातळ फांद्यांनाही ही फळे फारच दृढतेने लटकत असतात. कच्चे फळ आपोआप पडत नाही. लाकडाच्या टणक आवरणाच्या आत पिवळ्या रंगाचा बलक असतो. मध्ये गोल मटारच्या दाण्यांप्रमाणे बीज असून ते मधाच्या रंगासारखे तरल चिकट पदार्थाचे आवरण असते. हा पदार्थ डिंकासारखा असतो. जर बेलफळाची त्वचा इतकी मजबूत नसती तर या सुगंधित गोड बलकाचे रक्षण कसे झाले असते? हा एक निसर्गाचाच चमत्कार मानला पाहिजे. पिकलेल्या फळाच्या सुगंधाची तुलना संस्कृतामध्ये चंदनाशी केली गेली आहे. हा आतील बलक खायला गोड आणि स्वादिष्ट असतो. पोटाच्या आणि इतर व्याधी किंवा इतर अनेक रोगांसाठी या बलकाचा प्रयोग केला जातो. आयुर्वेदात बिल्व एक अत्यंत महत्त्वपूर्ण औषधाच्या रूपात वर्णिले गेले आहे. बेलफळाचे विविध आजारांवर अनेक उपाय सांगितलेले आहेत.

गावात कच्च्या घरांच्या बाहेरील भागात लिंपताना यातील बलक मिळविण्याचीही प्रथा आहे. त्यामुळे लिंपताना चिकणपणा आणि मजबूती येते. उंट या फळाला अत्यंत चवीने खातो. हे फळ तोडल्यानंतरही बरेच दिवस चांगले राहते.

याच औषधी गुणांमुळे हे फळ आणि याची पाने पवित्र मानली जातात. आणि श्रीफळ म्हणून श्रींची अधिष्ठात्री देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. मात्र सध्या बिल्व केवळ ' पूजेची वस्तू मानले जाते ही फार दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. मोठ्या शहरांमध्ये राहणारे असंख्य लोकांनी हे फळ खाणे तर दूरच या फळाला पाहिलेही नसेल. मोठ-मोठ्या बागेत आंबे, लीची, यासारखी फळांचे वृक्ष शोभा आणतात तिथे बेलाचे वृक्ष फारच कमी लोक लावतात. हे एक सुंदर, डेरेदार फळदार वृक्ष असल्याने ते लावण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. हा वृक्ष घरचा वैद्यही आहे. बेलफळ प्रोटिन्सचा अत्यंत उपयोगी स्रोत आणि टॉनिकही आहे. थंडावा प्रदान करणारा आहे. बेलफळात एंटीबायोटिक गुण असतात. डायरिया, हगवण, बद्धकोष्ट, अपचन या व्यतिरिक्त बेल अमिबिक डिसेंट्री आणि पोटदुखीतही उपयोगात येतो.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

कमी तेलात आणि बाहेरून कुरकुरीत! आषाढी एकादशीला बनवा हॉटेलसारखा परफेक्ट 'साबुदाणा वडा'; टिप करा नोट

कानांच्या काळजीसाठी ऑलिव्ह तेल का आणि कसे फायदेशीर आहे, फायदे जाणून घ्या

Career Tips: बीटेक इन पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता,व्याप्ती ,पगार जाणून घ्या

Homemade remedies: डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी सर्वात सोपा घरगुती उपाय, नक्की करून पहा

गुलाबाच्या पाकळ्या वापरून घरीच नैसर्गिक लिप बाम बनवा; ओठ अगदी मऊ राहतील

Show comments