Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उन्हाळ्यात फळं खा!

Updated: गुरूवार, 15 मे 2008 (12:54 IST)
उन्हाळा आला की गार गार वाटावं म्हणून कोल्ड्रिंक्सच्या बाटल्याच्या बाटल्या रिचवल्या जातात. पण अनेक रसायने युक्त असणारी ही कोल्ड्रिक्स तात्पुरती बरी वाटत असली तरी ती शरीराला त्रासदायक आहेत. त्यापेक्षा नैसर्गिक फळे वा त्यांचा रस या काळात घेणे उत्तम. यातून पोषक घटकही मिळतात. शिवाय उन्हाळ्यात पाण्याची पातळीही शरीरात राखली जाते.

प्रखर सूर्यकिरणांनी घाम येतो आणि घामामुळे शरीरात असलेले पाणी व इतर घटक बाहेर पडतात. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. डिहायड्रेशन झाल्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे आणि स्नायू ताणले गेल्यासारखे वाटतात. या तक्रारींपासून मुक्ती मिळवण्यासाठी फळांचे सेवन केले पाहिजे.

ND
टरबूज - उन्हाळ्यात सर्वांत उपयोगी फळ म्हणजे टरबूज. यात भरपूर पाणी असते. शिवाय कॅल्शियमही भरपूर प्रमाणात असते.


ND
सफरचंद - सफरचंदात सर्वांत जास्त फायबर असतात. या व्यतिरिक्त सफरचंदाच्या सालात एंटीऑक्सीडेंट घटक असतो. लोहही असते. यामुळे हे फक्त शरीरासाठीच नव्हे तर त्वचेसाठी सुद्धा गुणकारी आहे.

खरबूज - खरबूजसुद्धा खास उन्हाळ्यातील फळ आहे, यामुळे शरीराला गरजेइतके पाणी मिळते. यात व्हि‍टॅमिन ए, सी, लोह, सोडियम आणि पोटेशियम असते.

ND
बेरीज - यात स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लूबेरीज, ब्लॅकबेरीज ही सर्व फळे येतात. या फळांमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन 'सी' भरपूर असते.


WD
आंबा - फळांचा राजा आंबा. हे तर सर्वांचेच आवडते फळ आहे. यात फायबर, बीटाकेरोटीन आणि व्हिटॅमिन 'सी' असते.

केळी - केळी शरीराला थंडावा देतात. शिवाय त्यात नैसर्गिक साखरही असते.

ND
ज्यूस आणि सरबत
द्राक्ष, टरबूज, केळी, फणस अननस आणि लिंबाचा रस उन्हाळ्याच्या दिवसांत लाभदायक असतो, हे स्फूर्तिदायक आहेत शिवाय लवकर पचतात.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

रेस्टॉरंटसारखा तंदूरी गोबी टिक्का बनवा घरीच; लिहून घ्या रेसिपी

World Mosquito Day 2026 : जागतिक डास दिन; डासांपासून बचावाचे सोपे उपाय

कोणत्याही उपवासाला चालणारी, पौष्टिक अशा तीन खास टिक्की रेसिपीज

या ५ प्रकारच्या लोकांनी डाळिंब खाण्यापूर्वी सावधगिरी बाळगा

Air Hostess After 12th: बारावीनंतर एअर होस्टेस कसे बनता येते? तुमचा पगार किती असतो जाणून घ्या

Show comments