Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कावीळ

Updated: बुधवार, 4 जून 2008 (10:51 IST)
ND
कावीळ हा आजार अन्न-पाण्यातून काविळीचे जंतू जाऊन होतो. रुग्णाला भूक लागत नही. कोणतेही काम करायला उत्साह नसतो. तसेच सतत झोपावे वाटते. लघवी, डोळे यांचा रंग पिवळा होतो. पोटात लिव्हरच्या जागी दुखते. ह्या विकारात मुख्यत: लिव्हर खराब झालेली असते. आपल्या शरीराची पचनक्रिया ही मुकत्वेकरून लिव्हरवर अवलंबून असल्याने वरील लक्षणे दिसतात. या विकारात लिव्हरला विश्रांती देणे अतिशय महत्त्वाचे आहे.

म्हणून हलका आहार, थोडा-थोडा, वारंवार द्यावा. रुग्णाला ‍िवशेष भूक नसते. म्हणून खाण्याचा आग्रह करू नये.

पनचनाला हलका आहार म्हणजे पातळभात द्यावा. लिंबाचे लोणचे थोडेसे चालेल. पण भातावर तूप नको. पापड भाजून चालेल, तळून नको. चपातीलासुद्धा तेल तूप न लावता फुलक्याप्रमाणे कोरड्या द्याव्यात. भाकरीला तूप, लोणी नको.

दूध द्यायला हरकत नाही पण सायीसकट नको. तर नुसत्या दुधाच्या दह्याचे ताक चालेल. पचनाला हलकी अशी निरनिराळ्या कडधान्यांची सूप्स चालतील. कारण प्रोटीन्स शरीराबाहेर जात असतात.

काविळीसाठी पथ्याचे पदार्थ

* पातळ भात, चपाती, भाकरी (कोरडी, तेल, तूप न लावता)
* दूध (साय नको) निरनिराळ्या कडधान्यांचे सूप प्रकार
* पालक, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, मक्याची कणसे यांचे सूप, आमसुलाचे सार.
* तांदुळाच्या पिठाची, ज्वारीच्या पिठाची धिरडी, मुगाची खिचडी (मसालारहित) सर्व भाज्या घालून केलेला भात.
* फळांचे रस - ऊसाचा रस, लिंबाचे सरबत, कैरीचे पन्हे, आमसुलाचे सरबत, पपई, चिक्कू ही फळे.
* उसाचा रस पिण्यापेक्षा ऊस दातांनी तोडून खावा. आवश्यक ती शर्करा मिळण्याबरोबर रुग्ण खाण्यात गुंतला जातो.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

पावसाळ्यात घरीच नैसर्गिक कोरफड आणि कडुलिंबाचा साबण बनवून आपल्या त्वचेचे रक्षण करा…

उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय स्ट्रीट फूड प्रकार 'छोले टिकिया'

नाश्त्यासाठी झटपट, मऊ आणि स्पंजी 'रवा ढोकळा' उत्तम पर्याय

पावसाळ्यात दूषित पाणी ठरू शकते धोकादायक, या खबरदारीच्या टिप्स नक्की पाळा

इस्रोमध्ये पदवीधरांसाठी मोठी रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया सुरू, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा संपूर्ण माहिती जाणून घ्या

Show comments