Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तजेलदार त्वचेसाठी आहार

Updated: बुधवार, 2 एप्रिल 2008 (11:37 IST)
संतुलित आहार फक्त आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. तणावपूर्ण जीवनात चुकीच्या आहारामुळे त्वचा कोरडी होते आणि बर्‍याचदा त्वचेच्या समस्या निर्माण व्हावयास लागतात. त्वचा कोरडी होणे, डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि पूरळ इत्यादी.

त्वचेच्या समस्या अन्य कारणांमुळेही उद्भवू शकतात. हार्मोन्स परिवर्तन, जेनेटिक प्रॉम्बेम, आणि गर्भावस्थेचा काळ देखील त्वचेवर परिणाम घडवतो. पण 70% पेक्षा जास्त परिस्थितीत शुष्क त्वचेसाठी चुकीचा आहारच कारणीभूत ठरतो. वेगवेगळ्या त्वचेसाठी आहारही वेगळा हवा. पण त्वचेच्या आरोग्यासाठी खालील काही बाबी मात्र सर्वांसाठीच आवश्यक आहेत.

* जास्तीत-जास्त पाणी प्या. पाणी त्वचेसाठी चांगले औषध आहे. पाण्यामुळे आपण ताजेतवाने होतो त्याचबरोबर त्वचाही उजळते.

* आपल्या शरीराला ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेसाठी जीवनसत्वाची आवश्यकता असते. काही जीवनसत्वाची नावे खालीलप्रमाणे. ही जीवनसत्वे त्वचा तजेलदार राखण्यास मदत करतात.

1. जीवनसत्व सी: हे रसदार फळांमध्ये असते, संत्रे, मोसंबी...
2. जीवनसत्व ए: याचे प्रमुख स्रोत आहेत पपई, संत्रे...
3. जीवनसत्व बी: हे फळांसोबतच पत्तेदार भाज्यांमध्ये आढळते.
4. जीवनसत्व इ: हे शेंगदाणे, आणि अन्य कडधान्यांमध्ये आढळते.

त्वचा तजेलदार करणे अवघड नाही. फक्त त्यासाठी आहाराकड े लक्ष द्यायला हवे. वरील घटकांचा समावेश आहारात केल्यास तेही तुम्ही साध्य कराल.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पंचतंत्र : 'ब्राह्मण आणि तीन ठग'

Independence Day 2026 Essay in Marathi स्वातंत्र्य दिन निबंध

दिव्याच्या अमावस्येला नैवेद्यात काय बनवावे? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

Independence Day Special Trending Recipes; स्वातंत्र्य दिन विशेष खास ट्रेंडिग तिरंगा रेसिपीस

Shravan Somwar 2026 Wishes in Marahti श्रावणी सोमवरच्या शुभेच्छा

Show comments