आपले दात स्वच्छ आणि मजबूत राहावेत यासाठी स्ट्रॉबेरी हे एक अत्यंत उपुयक्त फळ आहे. स्ट्रॉबेरीमध्ये असे अनेक गुणधर्म आणि वैशिष्टये आहेत, जे दात स्वच्छकरून त्यांना ब्लीच करण्यास मदत करतात. चहा आणि कॉफीमुळे दातांवर पडलेले डाग स्ट्रॉबेरीमुळे स्वच्छ होतात. जेवणानंतर नियमितपणे थोडीफार स्ट्रॉबेरी खायला हवी. स्ट्रॉबेरीमधील आम्ल दातांना नैसर्गिकरीत्या उजळपणा आणते.
कोबी खाताना त्याचे दातांना घर्षण होते. त्यामुळे दात उजळण्यास मदत होते. कोबी हा नैसर्गिक टूथब्रश आहे. कोबी खाताना तोंडात लाळ तयार होते. ती दातांवर जमलेले सूक्ष्मकणही दूर करते.
कलिंगडाचे दोन काप दररोज खाल्ल्याने शरीरास जितकी 'क' जीवनसत्वाची गरज असते, त्यातील 25 टक्के व जीवनसत्व यातून मिळते. हे जीवनसत्व दात आणि हिरड्या यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. लोह अधिक प्रमाणात शोषूण घेण्याची क्षमता या जीवनसत्त्वात असते. त्याचबरोबर शरीरातील घातक रसायनांचाही ते सामना करू शकते. वाढत्या वयानुसार दातांची होणारी झीज रोखण्यासाठीही त्याची मदत होते.
संत्र हे 'क' जीवनसत्वाचे उत्तम स्त्रोत आहे. म्हणूनच संत्रीही नियमितपणे आहारात घेतली पाहिजेत. त्यामुळे दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य उत्तम राहते. लोह अधिक प्रमाणात शोषले जाते. तसेच 'क' जीवनसत्त्वाचे पदार्थ चघळल्यामुळे दातांचा नाश किंवा र्हास रोखला जाऊ शकतो.
' अॅन अॅपल अ डे कीप्स डॉक्टर अवे' अर्थात, दररोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरांना स्वत:पासून दूर ठेवणं शक्य होऊ शकते. सफरचंदामुळे दातांचे आयुष्यमान वाढते. सफरचंदाचा रस पिण्यापेक्षा ते चावून खाल्ल्यास दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते. सफरचंद खाल्ल्यामुळे दात स्वच्छ आणि बळकट होतात. त्याचबरोबर शरीरातील अनावश्यक शर्करादेखील कमी होते.
द्राक्षांमध्ये असलेले मॅलिक अॅसिड उत्प्रेरकांसारखे कार्य करते. त्यामुळे दात पांढरे शुभ्र होतात अन् दातांवरील डाग कमी होतात. जेवणानंतर पाणी प्यायल्यामुळे किंवा चूळ भरल्यामुळे दातांत अडकलेले कण निघून जाण्यास मदत होते.
गडद हिरव्या रंगाच्या भाज्या खाल्ल्यामुळे शरीरास रास बेटा केरोटिन मोठ्या प्रमाणावर मिळते. त्यामुळे मिळालेले 'अ' जीवनसत्व आपल्या शरीराला आणि दातांना बळकटी आणते.
दूध, दही, लोणी यसारख्या दुग्धजन्य पदार्थांमुळे शरीरास लॅक्टिक अॅसिड मिळते. त्यामुळे दातांची झीज रोखता येते. त्याचबरोबर दात किडणे, पोकळी निर्मार होणे यापासूनही बचाव होऊ शकतो. दुग्धजन्म पदार्थांमुळे असलेल्या कॅल्शिअममुळे दात आणि हिरड्या बळकट होतात. घट्ट लोणी खाल्ल्यामुळे किंवा चघळल्यामुळे तोंडात लाळ तयार होते आणि त्याचबरोबर दातांमध्ये अडकलेले अन्नकणही निघून जातात.
ताज्या हिरव्या द्विदल कडधान्यांचे दातांवर घर्षण होऊन दात स्वच्छ होतात. तसेच तोंडात लाळ तयार होते. विविधप्रकारे दातांची होणारी हानी तुम्ही योग्य पदार्थ खाऊन थांबवू शकता. आपली जीवनशैली आरोग्यदायी बनवून सुखी व आनंदी जीवन जगू शकता. दातांना दीर्घायुष्य देऊ शकता.