जमीन- * जमिनीवर अनवाणी पायांनी किंवा गवतावरील दवबिंदूवरून चालण्याने डोळयांना थंडावा मिळतो. * गवतावर कधी तरी झोपल्याने शरीराचा थकवा दूर होतो.
ND
पाणी- * दिवसभरात कमीत कमी तीन लीटर पाणी प्यावे. * सकाळी शुध्दोदकाने आंघोळ केल्याने शरीरातील सर्व रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे उत्साही वाटते व शरीराचे रक्ताभिसरणही सुधारते. उटणे, मुलतानी माती यांचा उपयोग शरीर स्वच्छतेसाठी करता येतो. * आंघोळीपूर्वी खरखरीत पंचाने रगडून आंघोळ केल्यास जास्त फायदा होतो. * तहान लागल्यास घोट घोट सावकाश पाणी घ्यावे. * पावसाळ्यात पाणी उकळून व गाळून प्यावे. * जेवण करताना गरज पडल्यास एक ते दोन घोट पाणी प्यावे. मात्र, ढसाढसा जास्त पाणी पिऊ नये कारण त्याने जठराग्नी मंद होतो. * जेवणापूर्वी अर्धा तास किंवा जेवणानंतर अर्ध्यातासाने पाणी प्यावे.
ND
प्रकाश- * घरात योग्य प्रकाश असावा. कोवळा सूर्यप्रकाश आपल्याला उत्साही बनवतो तर सूर्यप्रकाशामुळे आपल्याला 'ड' जीवनसत्त्वांचा लाभ होतो.
ND
वारा- * घर हवेशीर असावे. * झोपण्याच्या खोलीतील खिडक्या योग्य व उघड्या असाव्यात. * शक्य होईल तेव्हा मोकळ्या हवेत झोपावे. * सुर्योदयापूर्वी उठावे व फिरायला जावे किंवा व्यायाम करावा.
ND
आकाश- * आकाश म्हणजे अवकाश, मोकळेपणा, शरीरासाठी उपास करणे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. * शरीराचे चयापचय योग्य ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा उपास, फलाहार, रसाहार गरजेचा आहे. * उपासात लिंबू, पाणी, मध या बरोबरच फळे दिवसातून 3 ते 4 वेळा घ्यायला हवीत. त्यामुळे मन शांत होते व पचन संस्थेचे कार्य सुधारते.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
Read More