Dharma Sangrah

पावसाळ्यातील आहार

Updated: बुधवार, 9 जुलै 2008 (11:59 IST)
जेवण करण्यात आणि ते पचविण्यात जठराची मुख्य भूमिका असते. पावसाळ्यात जठराग्नी मंद होतो. म्हणूनच या काळात जास्त जेवल्यास ते नीट पचत नाही. म्हणूनच पावसाळ्यात पचनासंदर्भातील आजार होऊ नये यासाठी आहार काळजीपूर्वक घेतला पाहिजे.

संध्याकाळी लवकर जेवावे. त्यामुळे पचन सुलभपणे होते.

जड जेवण टाळावे. हल्के, ताजे आणि पचनास योग्य असाच आहार घ्यावा.

या काळात पाणी गढूळ असण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छ पाणी आपण पितोय ना याची काळजी घ्यावी.

अस्वच्छ पाण्याने अतिसारासह अनेक रोग होऊ शकतात.

आंबे नीट धुऊन खावेत.

जांभूळ आणि मक्याचे भुट्टे खाणे या काळात चांगले.

पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे विशेषतः मुलांचा त्यापासून बचाव करावा.

पावसाळ्यातील रोग-

फोड- पावसाळ्यात पाण्यामुळे चर्मरोग होण्याची शक्यता असते. सारखे पाण्यात भिजल्याने वा चिखलात गेल्याने चिखल्या होतात. त्यासाठी अशा ठिकाणी निंबाची साले रगडावीत. पिंपळाच्या पानावर तूप लावून त्याला थोडे गरम करून फोडांवर लावल्यास आराम मिळतो.

कोरडा खोकल ा- एलर्जी व थंडीमुळे हा खोकला होतो. त्यासाठी एंटीहिस्टेमाईनचा उपयोग करावा. तेलकट पदार्थ टाळावेत. कारण त्यामुळे गळ्याला संसर्ग होऊ शकतो.

सर्दी- पावसाळ्यात सर्दी होणे यात काही विशेष नाही. पण म्हणूनच सर्दी झाल्यानंतर काळजी घ्यावी. एक कप पाण्यात आले टाकून ते उकळावे. त्यात एक चमचा मध टाकून ते घ्यावे. असे दोनदा प्यायल्यास सर्दी लवकर बरी होते.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस

आषाढी एकादशीला बनवा काहीतरी गोड! १० मिनिटांत तयार होणारी 'रताळ्याची खीर'; तोंडाला सुटेल पाणी!

हे सुपरफूड्स शरीरातील लोहाची कमतरता दूर करतात, आहारात समावेश करा

आयसीएसआय (ICSI) कडून २० कार्यकारी सहाय्यक पदांसाठी बी.कॉम (B.Com) उमेदवारांसाठी संधी

Hair Care Tips: दह्यात हे ४ पदार्थ मिसळून लावा, केस होतील लांब, दाट आणि मजबूत