Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुले ठरतात दुःखाला कारण

Updated: गुरूवार, 8 मे 2008 (17:19 IST)
माणसाचं आनंदनिधान कशात असतं? अर्थातच लग्न, पैसा आणि मुलांमध्ये असंच तुमचं उत्तर असेल. पण तुम्ही चुकीचा विचार करताय? लग्न करून, भरपूर पैसा मिळवून मुलांमध्ये तुम्ही सुख शोधू पहात असाल तर खालची बातमी नीट वाचा. सुखी माणसाचा सदरा कुणालाच सापडलेला नाही. तरीदेखिल हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्राचे प्राध्यापक डॅनियल गिल्बर्ट यांनी तो बर्‍याच अभ्यासाअंती शोधून काढला आहे.

गिल्बर्ट यांच्या मते विवाहित लोक अविवाहितांपेक्षा आनंदी असतात, हे आकड्यांनिशी सिद्ध झालंय. भलेही मग ते सध्या एकटे, घटस्फोट घेऊन रहात असतील. शिवाय विवाहित लोक जास्त दिवस जगतात. त्यांचे वैयक्तिक आर्थिक उत्पन्नही जास्त असते. शिवाय सेक्सचा अनुभव असल्याने तो ते एंजॉयही करतात. म्हणूनच कोणत्याही अंगाने पाहिलं तर विवाहित मंडळी सुखी असतात.

त्याचवेळी पैशांच्या सहाय्यानेसुद्धा सुख विकत घेता येते. पण मर्यादित. लोकांना जेवढं वाटतं तेवढे सुख नक्कीच घेता येत नाही.

पैशामुळे भरपूर सुख विकत घेता येईल. म्हणजे तुम्हाला सुख देणारी साधने तुम्ही विकत घ्याल. पण जेवढे अधिक पैसे खर्च कराल, सुख तेवढे कमी कमी होत जाईल. एक वेळ तर अशी येईल, की तुम्हालाही वाटेल की तुमच्या आनंदासाठी पैसा फार काही करू शकत नाही. पण अर्थात तुमच्याकडे खूप पैसा आहे, म्हणून तुम्हाला वाईट वाटेल असेही नाही. तुम्हाला भरपूर पैसे मिळाले तरी तुम्ही निराश नक्कीच होणार नाही, असेही गिल्बर्ट नमूद करतात.

मुले म्हणजे संसारवेलीवरची फुले असे वाटते. पण आपल्या सुखावर मुलांचा नकारात्मक परिणाम होतो. हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण जेवढी जास्त मुले तेवढे जास्त दुःख, असे गिल्बर्ट यांचे अभ्यासाअंती झालेले मत आहे.

' मुलाच्या बाबतीतली 'गुड न्यूज' समजल्यानंतर घरांत आनंदी आनंद होतो. पण मुलाचा जन्म झाल्यानंतर मात्र तो टिकत नाही.' हे अमेरिकेत व युरोपात केलेल्या अनेक सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्याला पुष्टी देताना गिल्बर्ट म्हणतात, मुले बारा ते सोळा या पौगंडावस्थेत पोहोचतात. तेव्हा तर आनंदाची पातळी खूपच खाली आलेली असते. मुले होण्याआधी आनंदाचे एक टोक गाठलेले असते तर मुलगा पौगंडावस्थेत पोहोचल्यानंतर आनंद फारच कमी होतो.

मग माणूस पुन्हा एकदा सुखाच्या एका विशिष्ट पातळीवर केव्हा येतो, असे विचारले असता मुले मोठी होऊन दूर जातात, त्यावेळी सुख पुन्हा एका स्थिर पातळीवर येते, गिल्बर्ट स्पष्ट करतात.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

बेक्ड फेटा पास्ता ही बनवायला अत्यंत सोपी आणि चवीला अप्रतिम लागणारी व्हायरल डिश Baked Feta Pasta

शरीरात पोटॅशियमची कमतरताची लक्षणे, कारणे उपाय जाणून घ्या

Career in BTech in Tool Engineering: बीटेक इन टूल इंजिनीअरिंग मध्ये करिअर बनवा पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

Sabudana Rasmalai श्रावण उपवासात बनवा शाही मिठाईसारखी साबुदाणा रसमलाई

अक्रोडाची साल वापरून नैसर्गिक फेस स्क्रब बनवा, तुमची त्वचा अधिक मऊ आणि उजळेल…

Show comments