Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लठ्ठपणावर उपयोगी सदाफुली

Updated: बुधवार, 13 जून 2007 (10:55 IST)
Shreeya
सदाफुली हलकी, रुक्ष, कघाय, तिक्तरसयुक्त, विपाकात कटु व उष्णवीर्य समजली जाते. ती वात आणि पित्ताचे शमन करते, मेंदूला शांती देते, प्रमेहाचा नाश करते, मधुमेह नियंत्रित करते. ती भारनाशक असून लठ्ठपणा दूर करते. सदाफुलीच्या मुळाच्या सालीत फेलोनिक राड, एक उडनशील तेल, दोन अल्कोहोल, दोन ग्यालकोसाइड, टॅनिन, करोटिनाइड, स्टिरॉल व उससोलीक अॅसिड असते.

सदाफुलीच्या पाना-फुलांचा-मुळांचा उपयोग अनिद्रा आणि मानसिक उद्रेक दूरकरून शांती प्रदान करण्यासाठी केला जातो. विंचू आदि‍ विषारी प्राणी किंवा किडे चावले असता सदाफुलीच्या सालीचा लेप लावल्यास किंवा पानांचा रस चोळल्यास फायदा होतो. सदाफुलीची जांभळ्या रंगाची फुले मधुमेहात रक्तशर्करा कमी करण्यासाठी गुणकारी आहेत.

एका कपात तीन ताजी फुले घेऊन त्यात अर्धा कप गरम पाणी टाकावं. पाच-सहा निनिटांनी फले काढून टाकावीत. एवढ्या वेळात फुलांचे गुणततत्त्व पाण्यात उतरतील. हे पाणी रोज सकाळी अनशापोटी 8-10 दिवस घेऊन रक्तशर्करा तपासून अगोदरची आणि नंतरची तुलना करावी. रक्तशर्करा घटली असल्यास 8-10 दिवसांनी पुन्हा हा प्रयोग करून पहावा.

लठ्ठपणा दूर करण्यासाठी रोज सकाळी सदाफुलीची 3 पांढरी फुले खूप चाऊन चाऊन 8/10 दिवस खावीत. पुन्हा 8/10 दिवसानंतर हा प्रयोग करून पहावा.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

आकाश मुद्रा योग केल्याचे १४ आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : गोष्ट खार, वेळ आणि अक्रोडची

महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याची १० लक्षणे; ही चिन्हे दिसताच सावध व्हा

मुलांसाठी 'ह' अक्षरावरून ५० सुंदर आणि अर्थपूर्ण मराठी नावे

श्रावण स्पेशल: कांदा-लसूण न वापरता बनवा ५ झटपट पदार्थ

Show comments