Marathi Biodata Maker

लठ्‍ठपणा हा आजारच!

PR
PR
आजार म्हटलं की, आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. काही आजार इतके भयानक असतात की, त्यांच्यापासून आपल्या शरीरासह मनालाही इजा होत असते. त्यात हृदयरोग, मधुमेह, कर्करोग यासारख्या आजारांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. मात्र 'लठ्ठपणा'ही एक आजारच आहे. या आजाराची भयानकता ही वरील आजारांपेक्षा भयंकर असते. कारण हा आजार तपविता येत नाही. त्यामुळे चारचौघात आपल्याविषयी विनोदनिर्मिती होत असते.

हृदयरोग, मधुमेह, कर्करोग यासारख्या आजारांच्या रुग्णाकडे लोक सहानुभूतीपूर्वक बघतात. त्यामुळे रुग्णाला धीर येतो, त्याचे मनोबल उंचावते. मात्र लठ्ठ व स्थूल व्यक्तीकडे लोक उपहासात्मक दृष्टीने बघतात, हा निव्वळ खादाडपणाचा परिणाम आहे असे समजता‍‍त. एवढेच नव्हे तर त्यांच्या आजाराची चेष्टा-मस्करी करतात. त्यामुळे लठ्ठ व स्थूल व्यक्तीचे खच्चीकरण होते. प्रसंगी त्याच्यात वैफल्य निर्माण होत असते.

इतर देशांच्या तुलनेत हा आजार भारतात झपाट्याने पसरत चालला आहे. त्यातल्या त्यात 'लठ्ठपणा' पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक आहे. लठ्‍ठ व स्थूल पुरुष- महिलांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत असते. या आजाराचा त्यांच्या वैवाहिक जीवनावरही विपरीत परिणाम होत असतो. काहींचे तर या आजारामुळे कौटुंबिक जीवनही उद्‍धवस्त झाल्याचे अनेक उदाहारणे सापडतील.
PR
PR


महिला-पुरूषांच्या जीवनातील महत्त्वाची बाब म्हणजे लठ्ठपणामुळे त्यांना सेक्स समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत असते. महिलांनातर वांझत्त्व येण्‍याची शक्यता असते. महिलांच्या पोटावर अतिरिक्त चरबी जमा झाल्याने त्यांना दिवस राहत नाहीत. शिवाय काही महिलांना मासिक पाळी येणे बंद होऊन जाते. लठ्ठपणामुळे आपल्याला अनेक शाररिक व मानसिक आजार जडत असतात.

चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव व त्यामुळे येणारा लठ्ठपणा हा बर्‍याचशा गंभीर आजारांचे मूळ आहे. मात्र लठ्ठपणा हा आजार अतिखादाळपणामुळे होतो असे नाही. लठ्ठपणा येण्याची अनेक कारणे असू शकतात. एखाद्या वेळेस चुकच्या व्यायाम पध्दतीमुळेही हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपले शरीर प्रमाणापेक्षा अधिक स्थूल झाले आहे, हे जाणवणे म्हणजे या आजाराचे निदान आहे. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार सुरू करावा. अन्यथा हा आजार शेवटी वाढतो व अनेक आजारांना आमंत्रण देत असतो.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

Saffron Rose Biryani Recipe अतिशय शाही, सुगंधी आणि चवदार केशर गुलाब बिर्याणी

नियमित मल्टीविटामिन घेणे योग्य आहे की अयोग्य तज्ज्ञ काय सांगतात

१२ वी नंतर 'सप्लाय चेन मॅनेजमेंट'मध्ये करा दमदार करिअर; जाणून घ्या पात्रता, टॉप कॉलेज आणि पगार!

चष्म्याचे डाग नाकावरून काढण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

लघु कथा : विंचू आणि संत; कुप्रवृत्तीवर सुप्रवृत्तीचा विजय