Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरीरवेदनेवर संगीत रामबाण उपाय

Updated: गुरूवार, 20 ऑगस्ट 2015 (12:47 IST)
लंडनमधील क्कीन मेरी विद्यापीठाच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांनी ‘संगीत आणि विकार’ या विषयावर संशोधन केले. ‘एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याने संगीताचा आस्वाद घेतला तर त्याची चिंता तर कमी होतेच, पण वेदनांपासूनही त्याला आराम मिळतो. संगीत हे संवेदनाहारी असल्याने रुग्णांसाठी ते फारच परिणामकारक आहे,’ असे मत या डॉक्टरांनी मांडले. 
 
डॉ. कॅथरिन मेड्स यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने हे संशोधन केले आहे. ‘आम्ही आमच्या रुग्णालयातील डॉक्टरांना नेहमी सांगतो, रुग्णांना संगीतसाधने रुग्णालयात आणण्याची परवानगी द्यावी. रुग्णांनाही ‘औषध’ म्हणून नियमित संगीत ऐकण्याचा सल्लाही आम्ही देतो,’ असे डॉ. मेड्स यांनी सांगितले. डॉक्टरांच्या या पथकाने शस्त्रक्रिया झालेल्या सात हजार रुग्णांचा अभ्यास केला. या रुग्णांना अन्य उपचारांबरोबर नियमित संगीत ऐकविण्यात येत होते. मात्र इतर उपचारांपेक्षा त्यांच्या वेदना आणि मानसिक तणाव शमविण्यासाठी संगीताचा फार उपयोग झाला, असे डॉ. मेड्स सांगतात.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

अकबर-बिरबलची कहाणी : भक्तीचा विषय

पावसाळ्यात घरीच नैसर्गिक कोरफड आणि कडुलिंबाचा साबण बनवून आपल्या त्वचेचे रक्षण करा…

उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय स्ट्रीट फूड प्रकार 'छोले टिकिया'

नाश्त्यासाठी झटपट, मऊ आणि स्पंजी 'रवा ढोकळा' उत्तम पर्याय

पावसाळ्यात दूषित पाणी ठरू शकते धोकादायक, या खबरदारीच्या टिप्स नक्की पाळा

Show comments