Biodata Maker marathi
✕

सावधान! कम्प्युटरवर काम करताय?

Updated: शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (15:56 IST)
आजचे युग हे संगणकाचे आहे. सर्व व्यवहार हे कम्प्युटराइज झाल्याने त्याला टाळणे शक्य नाही. ऑफिसात, घरी कम्प्युटर असल्याने तो आता सखा, मित्र, सवंगडी झाला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तर संपूर्ण जग मानवाच्या अंगणात आले आहे. आपल्या लाडक्या कम्प्युटरला 'व्हायरस' ची लागण होऊ नये म्हणून आपण त्याची खूप काळची घेतो. मात्र, तासंतास कम्प्युटरवर काम करून आपल्या आरोग्यावर त्याचा किती विपरित परिणाम होत आहे, याकडे कधी लक्ष दिले आहे का?
 
कम्प्युटरसमोर तासंतास बसून आपण काम करतो. आपले कामही बिनचूक होते. मात्र सतत खुर्चीवर बसून आपली पाठ दुखणे, स्क्रीनकडे एक सारखे पाहिल्याने डोळ्यातून पाणी येणे, डोळे दुखणे तसेच की-बोर्ड अधिक हाताळल्याने हाताची बोटे दुखणे, बोटाच्या नसा आखडणे आदी दुखणी जडतात. त्याकडे आपले प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दुर्लक्ष होत असते. 
 
भविष्यात मात्र हे आजार गंभीर स्वरून धारण करतात व आपल्यासह आपल्या कुटुंबियांची डोकेदुखी होऊन बसतात. वैद्यकीय संज्ञेत त्याला 'रिपिटेटिव्ह स्ट्रेस सिंड्रोम' म्हटले जाते. त्यात 'टेंडोनाइटिस व कार्पल टनल सिंड्रोम' यांचाही सहभाग असतो.
 
'रिपिटेटिव्ह स्ट्रेस सिंड्रोम' हा आजार मांसपेशी, नसा व सांधे यांच्या कार्यप्रणालीत बिघाड झाल्याने होतो. या आजारापासून आपल्या आरोग्यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सगळ्यात आधी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, आपली काम करण्‍याची जागा आरामदायक आहे की नाही. कॉम्प्युटरचा मॉनिटर व आपले डोळे यांच्यातील अंतर साधारण एक हाताचे असले पाहिजे. हार्ड की असलेला की-बोर्ड वापरणे टाळावे.
 
माऊसला असा ठेवा की आपण त्याला सहज हाताळू शकतो. एकाच जागेवर जास्त वेळ बसू नका. स्क्रीनवर डोळे ताणून पाहिल्याने डोळ्यांना अधिक त्रास होतो. तासंतास कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहिल्याने व्हिजन सिंड्रोमची बाधा होऊ शकते. संभव असल्यास साधारण तास दीड तासातून एकदा ब्रेक घ्यावा. अशा ह्या गोष्टी आपल्याला लहान वाटतात. परंतु, त्याकडे लक्ष दिल्यास आपले आरोग्य अबाधित ठेऊ शकतो.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Bhavpurna Shradhanjali in Marathi Images भावपूर्ण श्रद्धांजली संदेश इमेजेस

Margashirsha Guruvar 2026 Wishes in Marathi मार्गशीर्ष गुरूवार शुभेच्छा संदेश

कार्तिकी एकादशीच्या फराळासाठी खास नवीन आणि हटके रेसिपीज येथे पहा Upvas Recipes for Kartiki Ekadashi

Benefits of guava हिवाळ्यात पेरू खाणे रोगप्रतिकारशक्तीपासून ते पचनापर्यंत अत्यंत फायदेशीर

पीएचडी म्युझिक मध्ये करिअर बनवा, पात्रता, पगार जाणून घ्या

Show comments