Marathi Biodata Maker
✕

गरोदर महिलांसाठी पौष्टिक डाळी! आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी आहारात नक्की करा समावेश

Updated: शनिवार, 17 ऑक्टोबर 2026 (15:38 IST)
ALSO READ: पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरच्या घरी करा हे सोपे उपाय

फायबर

पिवळ्या मूग डाळीमध्ये फायबर असते. गर्भवती महिलांसाठी ही डाळ अतिशय आरोग्यदायी आहे.पिवळ्या मूग डाळीतील फायबरमुळे बद्धकोष्ठता आणि गॅस्ट्रिक अल्सरचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. याशिवाय डाळींमध्ये असलेले फायबर मळमळ, पेटके, पोट फुगणे आणि मॉर्निंग सिकनेस कमी करते. फायबर फक्त डाळींमधूनच नाही तर हिरव्या भाज्या आणि फळांमधूनही मिळतं.
 

आयरन - 

गर्भधारणेदरम्यान, आई आणि मुलासाठी सर्व प्रकारची पोषक तत्वे आवश्यक असतात. त्याच वेळी, आई आणि मुलासाठी लोह(आयरन ) देखील आवश्यक आहे. मुगाच्या डाळीतून आयरनचा पुरवठा होतो. लोह हे एक महत्त्वाचे खनिज आहे, जे शरीराला महत्त्वपूर्ण कार्ये करण्यास मदत करते. पिवळी मूग डाळ हिमोग्लोबिन लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करते. मुगाच्या डाळीच्या सेवनाने आयरनचा पुरवठा होतो
ALSO READ: वजन घटवण्यासाठी सुका मेवा कसा भिजवावा? जाणून घ्या योग्य पद्धत

फॉलिक ऍसिड -

गरोदरपणात मूग खाल्ल्याने फोलेट मिळते. मूग डाळीमध्ये असलेले फोलेट बाळाच्या वाढीसाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, जेव्हा बाळाचा गर्भाशयात लवकर विकास होतो तेव्हा फॉलिक ऍसिड न्यूरल ट्यूब तयार करण्यास मदत करते. फॉलिक ऍसिड हे खूप महत्वाचे आहे कारण ते बाळाच्या मेंदू आणि मणक्याशी संबंधित दोष टाळण्यास मदत करतात.या डाळीच्या सेवनाने बाळाची स्मरणशक्ती सुधारते आणि त्याचे मन तीक्ष्ण होते.
 

अँटिऑक्सिडंट

मूग डाळीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गर्भधारणेदरम्यान शरीराला संरक्षण देण्याचे काम करतात. एका अहवालानुसार, मूग डाळीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि पहिल्या तिमाहीत गर्भपात होण्याचा धोका कमी करतात. मूग डाळीचे सेवन केल्याने शरीराला फ्री-रॅडिकल नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

ऑक्टोबरच्या उन्हामुळे त्वचा निस्तेज झाली आहे? रोजच्या स्किन केअरमध्ये हे ५ महत्त्वाचे बदल करा

Stress Hormone कॉर्टिसॉल नियंत्रित ठेवण्यासाठी कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

दसरा-दिवाळीसाठी पारंपरिक अनारसे बनवायचे आहेत? जाळीदार अनारशांची खास युक्ती जाणून घ्या

महिलांनो, मधुमेहामुळे वाढू शकतो ‘या’ कर्करोगाचा धोका; लक्षणे वेळीच ओळखा

डब्ल्यूएचओमध्ये इंटर्नशिपची संधी, २४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा; पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments