Dharma Sangrah
✕

World Heart Day 2023: हृदयरोग कशामुळे होतो, प्रकार, लक्षणे आणि उपचार

Updated: शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (10:10 IST)
 
हृदयविकाराचा झटका म्हणजे काय? : जेव्हा हृदयाच्या मुख्य धमनीत अचानक अडथळा आल्याने रक्तप्रवाह थांबतो, तेव्हा हृदयाच्या त्या भागाचे स्नायू टिकून राहू शकत नाहीत - याला 'हृदयविकाराचा झटका' म्हणतात.
 
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे: छातीच्या डाव्या बाजूला प्राणघातक वेदना, छातीवर खूप जड वस्तू ठेवल्यासारखे वाटणे. लक्षणांमध्ये खांदे, मान आणि बोटांपर्यंत वेदना पसरणे, घाम येणे, अस्वस्थता, मळमळ इ. ही लक्षणे असलेला रुग्ण बेशुद्ध होतो आणि हृदयाचे ठोकेही बंद होतात.
 
हृदयविकाराची कारणे : लठ्ठपणा, धूम्रपान, रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब, मद्यपान, अति चरबीयुक्त आहार, धकाधकीचे जीवन इत्यादी त्याची प्रमुख कारणे आहेत. फुफ्फुस, त्वचा आणि किडनीच्या समस्यांमुळेही हृदयविकाराची शक्यता असते. जास्त काम करणे, करमणुकीचे कोणतेही साधन नसणे, पुरेशी झोप न मिळणे, वेळेवर न खाणे, मांसाहार करणे, जास्त चहा-कॉफी पिणे, अति औषधे घेणे - ही सर्व हृदयविकाराची कारणे आहेत.
 
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे आढळल्यास काय करावे : आपत्कालीन परिस्थितीत ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. रुग्णाला त्याच्या पाठीवर झोपायला लावा. कपडे सैल करावे. हृदयाचे ठोके बंद झाल्याचे दिसल्यास छातीला मसाज करावा. दाबाचे झटके द्यावे, तोंडातून श्वास द्यावा. जर रुग्ण खोकू शकत असल्यास खूप खोकावे.
 
हृदय रोग उपचार आणि सावधगिरी :-
काळजी करु नये.
दारु-मांस इत्यादीचे सेवन तसेच मसालेदार आणि तिखट पदार्थांचे सेवन करु नये.
गोड खाणे टाळावे.
मीठ आणि स्निग्ध पदार्थ टाळावे.
काही दिवस केवळ फळं आणि भाज्यांचे ज्यूस याचे सेवन करावे.
शक्य असल्यास केवळ फळं, ज्वारीची भाकरी आणि दुधी भोपळ्याची भाजी खावी.
सकाळ - संध्याकाळ लिंबू गरम पाणी, मध तसेच फळांचा किंवा भाज्यांचा रस प्यावा.
सरदीपासून वाचावे. कफ होऊ देऊ नये. पोट स्वच्छ ठेवावे. कमी बोलावे. आवाज, धूळ, धूर आणि तीव्र सूर्यप्रकाश टाळावा.
कमीत कमी भोजन करावे.
वजन अधिक असल्यस कमी करावे.
या आजारात उपवास करणे टाळावे. फळांचा किंवा भाज्यांचा रस, मधु, मनुका, अंजीर, गायीचं ताजं दूध घ्यावे.
दररोज आपल्या आहारात भरपूर सॅलड वापरा. सॅलड आंबट नसावे.
तुम्ही जे काही खाता ते कमी प्रमाणात तसेच  चघळत आणि हळूहळू खावे.
जेवताना पाणी कमी प्यावे. 
जेवल्यानंतर अर्धा ते एक तासानंतर पाणी प्यावे.
पाण्याचे लहान लहान घोट घ्यावे.
रात्रीचे जेवण झोपण्याच्या अडीच तास आधी करावे.
आनंदी मूडमध्ये जेवण करावे.
अधिक बोलू नये. 
राग करणे आणि मोठ्याने बोलणे थांबवावे.
 
नोट- शेवटी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर उपचार करावा.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

Lal Bahadur Shastri Jayanti 2026 Wishes in Marathi लाल बहादूर शास्त्री जयंती मराठी शुभेच्छा

Lal Bahadur Shastri Jayanti Speech in Marathi लाल बहादूर शास्त्री जयंती भाषण

रेस्टॉरंटसारखी चिकन करी बनवा घरीच! सोपी आणि चविष्ट पद्धत

फक्त २० मिनिटांत घरीच फिटनेस मिळवा, जाणून घ्या प्रभावी व्यायाम

ऑक्टोबर ‘स्तन कर्करोग जागरूकता महिना’ October Breast Cancer Awareness Month

पुढील लेख
Show comments