Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Prediabetes Signs मधुमेहापूर्वीच शरीरात दिसू लागतात, चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नका

Updated: बुधवार, 17 एप्रिल 2024 (17:51 IST)
 
वारंवार मूत्रविसर्जन
जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल तर ते प्रीडायबिटीज दर्शवू शकते. खरं तर जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय वाढते, तेव्हा मूत्रपिंडांना अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळे तुम्हाला वारंवार लघवी करावी लागू शकते. तुम्हालाही अशा समस्या येत असतील तर ताबडतोब तुमच्या आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधा.
 
त्वचेचा रंग गडद होणे
जेव्हा शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा शरीराच्या काही भागांची त्वचा गडद दिसू लागते. या स्थितीत मानेवर, हाताखालील आणि कोपरांवर जाड काळी त्वचा दिसते. हे इन्सुलिनच्या प्रतिकाराचे लक्षण असू शकते, जे प्रीडायबिटीजचे प्रमुख घटक आहे.
 
सर्व वेळ थकवा जाणवणे
योग्य खाल्ल्यानंतर आणि पुरेशी विश्रांती घेऊनही तुम्हाला सतत थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल तर ते प्री-डायबेटिसचे लक्षण असू शकते. मात्र यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. अशा परिस्थितीत नेमके कारण शोधण्यासाठी, आपण एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करा.
 
वारंवार तहान लागणे
वारंवार तहान लागणे हे देखील प्रीडायबेटिसचे लक्षण असू शकते. जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा आपले शरीर लघवीद्वारे ती काढून टाकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि तहान जास्त लागते.
 
पोटाची चरबी वाढते
पुरुषांच्या कंबरेचा आकार 40 इंचापेक्षा जास्त आणि महिलांच्या कंबरेचा आकार 35 इंचांपेक्षा जास्त असेल तर ते प्रीडायबेटिसचे लक्षण असू शकते. शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढली की पोटाभोवती अधिक चरबी दिसू लागते. या प्रकारची चरबी शरीरात रसायने सोडते, ज्यामुळे इन्सुलिनच्या कार्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे रक्तातील साखर वाढते आणि व्यक्ती मधुमेहाची शिकार होऊ शकते.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Mangalagaur 2026 Wishes in Marathi मंगळागौर शुभेच्छा संदेश

Fasting Fruit Yogurt श्रावणात उपवासाच्या दिवशी थंडगार, पौष्टिक फ्रुट योगर्ट नक्की ट्राय करा

प्रोटीनची कमतरता झाल्यास शरीर देते ‘हे’ संकेत, लक्षणे जाणून घ्या

Bank of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदामध्ये २०६ पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

कोपर आणि गुडघे काळे पडले आहेत? काळसरपणा कमी करण्यासाठी करा हे उपाय करा

पुढील लेख
Show comments