Dharma Sangrah
✕

नवरात्रीचे उपवास सोडताना काय खावे आणि काय टाळावे? जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला

Updated: सोमवार, 19 ऑक्टोबर 2026 (12:52 IST)
 
हलके आणि पचायला सोपे अन्न:
मुगाच्या डाळीची खिचडी किंवा वरणभात (कमी तेलात/तुपात केलेली)
दुधी भोपळा, लाल भोपळा किंवा मुगाचे वरण-भात
सुकामेवा: २-३ भिजवलेले बदाम, मणुक किंवा खजूर खाऊन उपवास सोडणे उत्तम मानले जाते.
दही किंवा ताक: गुठळ्या नसलेले ताजे दही किंवा जिरे-कोथिंबीर घातलेले ताक पोटाला थंडावा देते आणि चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवते.
 
काय टाळावे? (अयोग्य आहार)
उपवास सोडताना खालील पदार्थ खाणे पचनासाठी हानिकारक ठरू शकते:
तळलेले आणि अति-तेलकट पदार्थ: भजी, वडे, तळलेले पापड किंवा साबुदाणा वडा खाणे टाळा. यामुळे तीव्र ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते.
अति तिखट आणि मसालेदार अन्न: उपवासानंतर लगेचच जास्त तिखट किंवा गरम मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या अस्तराला (Stomach lining) त्रास होतो.
कॅफिन आणि पॅक केलेले पेय: चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स किंवा प्रोसेस्ड ज्यूस उपवास सोडताना अजिबात पिऊ नका. यामुळे डिहायड्रेशन आणि ॲसिडिटी वाढते.
अति गोड पदार्थ: मिठाई किंवा जास्त साखरेचे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढून नंतर अचानक खालावू शकते (Blood sugar spike).
अतिप्रमाणात जेवण: खूप भूक लागली असली तरी एकदम भरपूर खाऊ नका. थोडे-थोडे करून २-३ टप्प्यांत जेवा.
 
उपवास सोडताना पाळावयाचा आदर्श क्रम
शुरुवात: १ ग्लास नारळ पाणी किंवा लिंबू पाणी + २ भिजवलेले बदाम / खजूर.
अर्ध्या तासानंतर: मऊ शिजवलेली मुगाची डाळ आणि भात किंवा ताजी फळे.
रात्रीचे/नंतरचे जेवण: हलकी भाजी, पोळी किंवा वरण-भात.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

कमी तेलात खुसखुशीत चिवडा कसा बनवाल? कुरकुरीतपणा टिकवण्याची युक्ती

Mahanavami 2026 Wishes in Marathi महानवमी शुभेच्छा संदेश मराठी

महाराष्ट्रातील दहा प्रसिद्ध व्यंजन म्हणजे चविष्ट, पारंपरिक आणि वैविध्यपूर्ण पदार्थांची मेजवानी

नखे आणि हिरड्यांमधील बदलांकडे दुर्लक्ष करू नका! आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे संकेत ओळखा

LLM Labour Law करून बनवा कामगार कायद्यात करिअर! पात्रता, टॉप कॉलेजेस, नोकरीच्या संधी आणि पगार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments