Marathi Biodata Maker
✕

PCOD आणि पाळीच्या समस्या असणाऱ्या महिलांनी 'हा' आहार घ्या

Updated: शनिवार, 29 जुलै 2023 (09:30 IST)
 
तंतुमय पदार्थामध्ये मुख्यत्वे भाज्या, फळे आणि मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश असतो.
 
तृणधान्य, चणे, राजमा, हिरवे मटार, अंबाडी, अंजिर, पालक, पेर, पेरू, खोबरे यांच्यामधून भरपूर फायबर मिळतात. गाजर, सफरचंद, मका, मक्याच्या लाह्या, सालीसह उकडलेले बटाटे, बदाम, स्ट्रॉबेरी, संत्री यामध्येही भरपूर प्रमाणात फायबर असतात.
 
कमी फॅट असलेलया प्रथिनांचा आहारात समावेश करा
 
प्रथिनयुक्त आहार शरीरातील एंड्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉनची वाढलेली पातळी कमी करण्यात मदत होते, त्याचप्रमाणे वाढलेल वजन नियंत्रणात आणायला पण प्रथिनयुक्त आहाराची मदत होते.
 
डाळी, कडधान्य, मासे, चिकन, अंडी इत्यादी. तसेच शरीरातील वाढलेल साखरेचं प्रमाण असतं ते सुद्धा नियंत्रित ठेवायला प्रथिनं मदत करतात.
 
हिरव्या पालेभाज्या जरूर खा.
 
पालक, मेथी, माठ,राजगिरा यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर , लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हीटॅमिन बी आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.
 
हिरव्या पालेभाज्यांमधे सर्व महत्त्वाचे पोषक घटक असल्यानं शरीराची वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी त्या महत्वाच्या असतात. व्हिटॅमिन बी हा आठ वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सचा समूह आहे.
 
या आठ जीवनसत्वांमध्ये थियामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, पँटोथेनिक अॅसिड, बायोटिन, फोलेट, कोबालमिन यांचा समावेश असतो.
 
थकवा कमी करण्यासाठी काय खावं?
हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह असतं, त्यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.
 
लाल मांसातही लोह असतं. सी जीवनसत्त्व असणाऱ्या लिंबासारख्या फळांचा आहारात समावेश हवा.
 
शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळायला हवं. आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश वाढवावा कारण त्यांच्यात पुरेशी जीवनसत्त्वं असतात.
 
प्रक्रिया केलेलं अन्न टाळावं, साखरेचं अतिसेवन करू नये आणि दिवसभरात सतत खाण्यापेक्षा पोट भरून तीनदा व्यवस्थित जेवण करून सतत अध्येमध्ये खाणं टाळावं.
 
साखरेचे पदार्थ टाळा
क्तातील साखर वाढल्याने लठ्ठपणा वाढतो, तर ते टाळण्यासाठी बेकरी पदार्थ, चॉकलेट्स, फळांचे रस किंवा कुठलेही गोड पदार्थ खाणं पूर्ण बंद करा.
 
या सगळ्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचा इंसुलिनच्या पातळीवर नकारात्मक परिणाम होतो.
 
कार्बोहायड्रेटसयुक्त आहार कमी करा
कार्बोहायड्रेटमध्ये फायबर नसतं आणि ते इन्सुलिनची पातळी वाढवतात. जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेटस् खाल्ल्याने वजन वाढू शकतं. प्रक्रिया केलेल्या कार्बोहायड्रेट स्त्रोतांमध्ये केक, पेस्ट्री आणि पांढरा ब्रेड यांचा समावेश होतो.तसेच पांढरे तांदूळ आणि बटाट्यासारख्या गोष्टींमध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे या गोष्टी आहारातून कमी करा
 
तळलेले पदार्थ खरे तर जास्त प्रमाणात मीठ आणि ट्रान्स फॅट्स युक्त आहेत आणि ते PCOD साठी चांगले नाहीत, त्याचप्रमाणे या तळलेल्या पदार्थात कॅलरीज हि जास्त असतात, ज्यामुळे वजन वाढू शकतं. ते टाळण्यासाठी तळलेले पदार्थ टाळलेलेच बरे.
 
अशाप्रकारे सकस आहार, योगासने किंवा व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून PCOD बरा होऊ शकतो.
 
प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट चालतेच असं नाही. त्यांच्या आजारानुसार, आजाराच्या तीव्रतेनुसार त्यांच्या आहारात बदल करावे लागतात. त्यामुळे आहारतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ यांचा सल्ला जरूर घ्या.
 


Published By- Priya Dixit 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

सासू-सुनेच्या नात्यात गैरसमज वाढू नयेत म्हणून रोजच्या आयुष्यात काय बदल कराल?

कमी तेलात बनवा कुरकुरीत उपवासाचे कटलेट; नवरात्रीत संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय

दररोज कॉफी पिणे ठरू शकते फायदेशीर; जाणून घ्या आरोग्यासाठी होणारे महत्त्वाचे फायदे

LLM कॉर्पोरेट एंड कमर्शियल लॉ मध्ये करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांनी त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी रोज करा या सोप्या स्किनकेअर टिप्स

पुढील लेख
Show comments