suvichar
✕

गर्भधारणेदरम्यान पोषाहार

Updated: शनिवार, 12 सप्टेंबर 2009 (17:26 IST)
गर्भधारणेदरम्यान पोषक आहाराची गरज अधिक असते. गर्भातील बाळ तसंच गर्भवती महिलेच्या गरजा भागवण्यासाठी अतिरीक्त अन्नाची गरज असते. मातृत्व काळातील कुपोषणामुळे बालकांचं जन्माच्या वेळचं वजन कमी राहतं आणि माता तसंच बालमृत्युदराचं प्रमाण वाढतं. बाळाचं वजन वाढवणं आणि मातेच्या शरीरातील चरबीचं प्रमाण वाढवण्यासाठी अतिरीक्त अन्नाची गरज असते. अंगावरील दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी स्तनदा मातांना अधिक पोषक अन्नाची गरज असते.

गर्भवती महिलांसाठी आहाराची गरज
एखाद्या गर्भवती महिलेच्या आहाराचा तिच्या बाळाच्या जन्मावेळच्या वजनावर थेट परिणाम होतो. गर्भधारणेदरम्यान संरक्षणात्मक अन्न मोठ्या प्रमाणात घेतले पाहिजे. गर्भवती महिलांना अतिरीक्त 300 किलो कॅलरी ऊर्जा, अधिक 15 ग्रॅम प्रथिने आणि 10 ग्रॅम चरबी गर्भधारणेच्या काळाच्या मध्यापासून आवश्यक असते.

गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपानादरम्यान हाडे आणि दांत यांच्या सुयोग्य निर्मितीसाठी तसंच स्तनातून दूध येण्यासाठी अतिरीक्त प्रमाणात कॅल्शिअमची आवश्यकता असते. गर्भधारणेदरम्यान लोहाची कमतरता झाल्यास माता मृत्यु दर आणि जन्मावेळी वजन कमी राहण्याची शक्यता वाढते. म्हणून, लोहसमृध्द अन्न घेणं अत्यावश्यक आहे.

गर्भधारणेदरम्यान काय करावे, काय करु नये
* गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करवण्याच्या काळात अधिक अन्न घ्यावे.
* एक अतिरीक्त जेवण चालू शकेल.
* संपूर्ण धान्य, मोडवलेलं कडधान्य आणि आंबवलेले पदार्थ खावेत.
दूध, मांस, अंडे यांचे सेवन करावे.
* भरपूर पालेभाज्या आणि फळे खावीत.
* मद्य किंवा तंबाकू यांचे सेवन करु नये.
* चहा आणि कॉफी यांसारखी पेये आहारातील लोहाला बांधून ठेवतात आणि उपलब्ध होऊ देत नाहीत, त्यामुळं ती आहारापूर्वी आणि नंतर लगेच घेऊ नयेत.
* गर्भवती महिलांना चालणे आणि अन्य शारीरिक कामं आवश्यक आहेत आणि त्यांनी अति शारीरिक काम, विशेषतः गर्भधारणेच्या अंतिम महिन्यात टाळावे.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

वजन कमी करायचे आहे? कॅलरी मोजण्याऐवजी जेवणाच्या प्रमाणावर लक्ष द्या!

How to choose the best course after 12th grade बारावीनंतर सर्वोत्तम अभ्यासक्रम कसा निवडावा?

मऊ, सुंदर आणि गुलाबासारखे ओठ हवेत? सलग एक महिना रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर मध लावून पहा

हिवाळ्यात मोजे घालून झोपणे योग्य आहे की अयोग्य? जाणून घ्या....

बागकाम टिप्स: कोरफडीचे कोमेजलेले रोप पुन्हा हिरवेगार ठेवण्यासाठी वापरा या सोप्या पद्धती

Show comments