1) शारीर आरोग्य उत्तम राखण्यासाठी- * प्रातःकाळी सूर्योदयाच्या आधी उठावे. * नियमित व्यायाम, मॉर्निंग वॉक व योगासने करणे लाभदायक आहे. * सकाळची कामे नियमित व वेळेवर केली पाहिजेत. * दररोज अंघोळ केल्याने तन व मन स्वस्थ राहते. * पौष्टिक व संतुलित आहार घ्यावा. * दररोजच्या आहारात फळे व हिरव्या पालेभाज्या हव्यात. * दोन वेळच्या जेवणात साधारण सात ते आठ तासांचा अवधी ठेवला पाहिजे. * जेवण केल्यानंतर दोन तासांनी झोपावे. * दररोज 10 ते 12 ग्लास पाणी सेवन केले पाहिजे. * जास्त क्षारयुक्त व शर्करायुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. * धूम्रपान, दारू, चटपटीत पदार्थ व 'फास्टफूड' यांच्यापासून दूर राहा. * आठवड्यातून एक दिवस उपवास ठेवावा. त्याने पचनक्रियेस आराम मिळतो. * आपल्या दिनचर्येत शारीरिक श्रम असावेत, त्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, एसिडिटी, अनिद्रा, कॅन्सर व हृदयरोगापासून स्वत:ला वाचवू शकाल. कामाच्या व्यापातून आपल्या परिवारासाठी वेळ काढावा. * कामासोबत शरीराला आरामाची देखील गरज असते. पुरेपूर झोप घ्या. रात्री आठ ते दहा तास झोप आवश्यक आहे. * नियमित शरीराची तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
ND
ND
2) मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी - * व्यायाम, काम व आराम यांच्यात समन्वय साधावा. * 'जीवन' ही परमेश्वराने दिलेली एक देणगी आहे. प्रातःकाळी परमेश्वराचे मनापासून स्मरण, चिंतन करा. * मनात नेहमी सकारात्मक विचार आणा. * प्रसन्नचित्त राहणे हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे. * दिवास्वप्न आत्मविश्वास वाढवतात. * फावल्या वेळात सुमधुर संगीत ऐका. * रडणे हे देखील आरोग्यवर्धक टॉनिक आहे. रडण्याने मन मोकळे होते.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
Read More