suvichar
✕

व्यायाम केल्याविना कमी करा वजन

Updated: सोमवार, 28 सप्टेंबर 2015 (16:26 IST)
 
* ऍक्टिव्ह राहा: कोणतेही काम सुस्तपणे न करता ऍक्टिव्ह राहा. याने रक्त प्रवाहाला गती मिळेल आणि शरीराचा आपोआप व्यायाम होईल. 


 
* फॅटी फूड टाळा: पिझ्झा, पास्ता, चीज, बर्गर अश्या फॅटी पदार्थांपासून दूर राहा, कारण या पदार्थांने वजन वाढण्याची गती वाढते. यात अत्यधिक प्रमाणात फॅट्स असतात आणि यांचा मोह सोडला नाही तर वजन कमी होणे शक्य नाही.

* भुकेपेक्षा कमी खावे: एकाच वेळी खूप खाणे योग्य नाही. जेवढी भूक असेल त्याहून कमी भोजन करावे. याने चरबी चढत नाही. या व्यतिरिक्त डिनरमध्ये सलाड, फळं आणि लिक्विड पदार्थांचे सेवन करावे.


 
* प्रोटीन आणि फायबर: आपल्या आहारात प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात घ्यावं. याने पोट भरल्यासारखे वाटेल आणि अतिरिक्त कॅलरीपासून बचाव होईल. या व्यतिरिक्त फायबरने मिळणारी ऊर्जा आपल्याला ऍक्टिव्ह राहण्यासाठी बाध्य करेल ज्याने आपोआप वजन कमी होईल.
 

* जेवून लगेच झोपू नये: डिनर झाल्यावर लगेच झोपू नये. डिनर आणि झोपेच्या मध्ये सुमारे दोन ते तीन तासांचे अंतर असावे.


 
* भरपूर झोप घ्यावी: झोपेच्या अनियमितपणामुळे किंवा कमी झोप घेतल्यामुळे वजन वाढतं. चांगल्या आरोग्यासाठी 6 ते 8 तास झोपावे. झोप पूर्ण न झाल्यास ताण वाढतो आणि ताण वाढल्याने पण वजन वाढतं.

* पाणी: दिवसभरात प्रत्येक तासाला ठराविक प्रमाणात पाणी प्यावे. जेवण्याच्या थोड्या वेळ आधी आणि थोड्या वेळ नंतर पाणी प्यावे. याने पचन क्रिया व्यवस्थित राहते. जेवल्यानंतर गरम पाणी पिण्याने पानी अतिरिक्त चरबीपासून बचाव होईल. सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याने चरबी कमी होते. या व्यतिरिक्त दिवसातून दोन-तीन वेळा गरम पाणी पिण्याने वजन कमी होईल. 


 
* आराम हराम: जर आपल्या ऑफिसमध्ये जास्त वेळ बसल्या राहण्याची सवय जडली असेल तर ती लगेच सोडा. तासोतास एकाच जागी बसून राहण्याने पोट आणि हिप्सची चरबी वाढते. अश्या परिस्थितीत थोड्या थोड्या वेळ्यात उठून फिरावे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक आकर्षक बनवणारे ७ महत्त्वाचे छंद जाणून घ्या

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी: 'या' शासकीय पोर्टलवर नोंदणी करून घरबसल्या मिळवा रोजगार

तुम्हाला पैसे वाया घालवायचे नसतील तर मोसंबी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Shree Balasaheb Thackeray Smrutidin 2026 Vinmra Abhivadan हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन संदेश

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रभावी व्यक्तिमत्त्व निबंध

Show comments