Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सतत आनंदी राहण्यासाठी

Updated: सोमवार, 14 सप्टेंबर 2009 (15:01 IST)
* आज दिवसभर काहीतरी चांगल घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच-दहा वेळा मनाशी म्हणा.
* समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा. स्वत:बद्दल कमी बोला.
* दर दोन दिवसांनी एखादे गुलाबाचे फुल आणा व त्याला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये योग्य स्थान द्या.
* आवडते गाणे पुन्हा पुन्हा ऐका व गुणगुणत रहा.
* चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वत:जवळ बाळगा व एखादा विचार घेऊन त्यावर मनन-चिंतन करा
* चालण्याची गती थोडी वाढवा व ताठ मनाने स्मित व्यक्त करत आवडत्या पेहरावात समाजात वावरा
* लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळ त्याच्यासारखेच होऊन वावरा
* जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या दिर्घ श्वसन करा
* स्वत:च्या चांगल्या पेहरावातील हसर्‍या चेहर्‍याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा
* एखादी बाग, देऊळ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा पंधरा मिनिटे घालवा
* नकारत्मक शब्दांचा वापर पुर्णपणे टाळुन, उत्साहपूर्ण चांगल्या शब्दाचा वापर रोजच्या संभाषणात करा
* विनोदी सिरीयल पाहताना खळखळुन हसा व शरीराची हालचाल होऊ द्या.
ND
* चार वर्षाचे बालक दिवसात साधरणत: पाचशे वेळा हसत असते तर एव्हरेज मनुष्य जेमतेम पंधरा वेळा, यामुळे स्ट्रेस वाढत जातो, याकरीता अधिकाधिक आनंद व्यक्त करण्याची संधी निर्माण करा.
* शरीरातील त्र्यैशी टक्के संवेदना ह्या डोळ्यांच्या माध्मातून होत असतात. या करीता भोवतालचे वातावरण प्रसन्नपूर्वक व प्रकाशयुक्त ठेवा.
* रिकामे मन सैतानाचे घर असते त्याकरिता स्वत:ला आवडत्या छंदामध्ये गुंतवा, सतत काहीतरी करत रहा.
* संगीतमध्ये उत्साह जागृत करण्याची शक्ती आहे, रोजचे काम करताना आवडीचे संगीत बॅकग्राउंडला चालु असुद्या.
* चिडचिडेपणा, डोक्याला आठ्या पाडणारा स्वभाव उखडून टाका. मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सुचना करा.
* विनोदाला जीवनात महत्वाचे स्थान द्या, कोणत्याही वातावरणात मोकळेपणा आणण्यास तो मदतगार ठरतो.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

Lung Cancer सतत खोकला म्हणजे साधा त्रास नाही? सुरुवातीची ही लक्षणे दिसत नाहीत म्हणून होतो उशीर; वेळीच निदान का गरजेचे?

Mangalagaur 2026 Wishes in Marathi मंगळागौर शुभेच्छा संदेश

''गुलाबी बीटरूट उपमा'' आकर्षक असण्यासोबतच आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक Pink Beetroot Upma

वारंवार उचकी लागत असेल तर सावधान! कोणत्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जाणून घ्या

IOCL Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये ४७० कार्यकारी पदांची भरती; ३ सप्टेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

Show comments