suvichar
✕

स्थूलपणा धोकेदायकच!

Updated: शनिवार, 12 सप्टेंबर 2009 (17:39 IST)
शरीरावर अतिरीक्त चरबी वाढत असल्याने आपण स्थूल होत असतो. त्यमुळे आपल्याला आवश्यक वजनापेक्षा 20 टक्क्याने वजन वाढत असते. स्थूलतेमुळे आपल्या आरोग्यावरही अनेक प्रकारचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे अकाली मृत्यु सुध्दा ओढवू शकतो. स्थूलपणा उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कर्करोगासही कारणीभूत ठरत असत ो.

स्थूलपणाची कारणे-
* अतिप्रमाणात खाणे आणि कमी शारीरिक श्रम दोघेही मिळून स्थूलपणा निर्माण करतात.
* ऊर्जेचं ग्रहण आणि ऊर्जेचा खर्च यांच्यात तीव्र असमतोल झाल्यानं स्थूलपणा आणि लठ्ठपणा उद्‍भवतो.
* आहारातून अतीप्रमाणात चरबी घेण्यामुळंही स्थूलपणा येतो.
* गुंतागुंतीची वर्तणूक आणि मानशास्त्रीय कारणांमुळं देखील अति अन्नसेवन आणि परिणामी लठ्ठपणा येतो.
ऊर्जेच्या वापरातील चयापाचयिक चुका मेद साठण्यास उत्तेजन देऊ शकतात.
* बालपण आणि पौगंडावस्थेतील स्थूलपणा यांच्यामुळं प्रौढावस्थेत स्थूलपणा येऊ शकतो. महिलांमधे, गर्भधारणेच्या वेळेस आणि रजोनिवृ्त्तीनंतर स्थूलपणा येतो.

वजन कसे कमी कराल!
* तळलेले अन्न कमी खावे.
* फळे आणि भाज्या अधिक प्रमाणात खाव्यात.
* संपूर्ण धान्य, हरभरे आणि मोडवलेलं धान्यं यांसारखे तंतुमय अन्न पदार्थ अधिक प्रमाणात खावेत.
* शरीराचं वजन सामान्य पातळीत राखण्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा.
* शरीराचं वजन हळू आणि स्थिरपणे कमी करणे हितकारक.
* अती प्रमाणात उपवास करण्यानं आरोग्य धोक्यात य़ेऊ शकतं.
* आपल्या शारीरिक कार्यांचा समतोल राखण्यासाठी आवश्यक विविध प्रकारचे अन्न पदार्थ खावेत.
* अन्न थोडे-थोडे आणि नियमित अंतराने खावे.
* साखर, चरबीयुक्त पदार्थ आणि मद्याचे प्रमाण कमी करावे.
* कमी स्निग्धता असलेले दूध घ्यावे.
* वजन कमी करणारा आहार हा प्रथिनांनी समृध्द आणि कर्बोदकं तसंच चरबी कमी असलेला असावा.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

केसांना एरंडेल तेल लावण्याचे फायदे तोटे जाणून घ्या

Happy Amla Navami 2026 आवळा नवमी शुभेच्छा

न्यूरोएंडोक्राइन कर्करोग म्हणजे काय? त्याची लक्षणे जाणून घ्या

बालासन करताना ही खबरदारी घ्या, योग्य पद्धत जाणून घ्या

पौराणिक कथा : कृष्ण आणि सुदामाची मैत्री

Show comments