Dharma Sangrah
✕

आरोग्याविषयी काही घरगुती उपाय!

Published: सोमवार, 2 एप्रिल 2012 (16:42 IST)
निद्रानाश
डोक्याला आणि तळपायांना राईच्या तेलाने मसाज केल्याने चांगली झोप येते.
6 ग्रॅम खसखस, 250 ग्रॅम पाण्यात वाटून कापडाने गाळून त्यात 25 ग्रॅम खडीसाखर घालून सकाळी व संध्याकाळी घ्यावी. नियमितपणे घेतल्याने निद्रानाशाचा त्रास कायमस्वरूपी थांबतो.

रात्री झोप न लागणे (निद्रानाश)
कपभर दुधात थोडे जायफळ उगाळून त्यात साखर घालून हे दूध रोज रात्री प्यावे. डोक्यावर तिळाचे तेल थापावे म्हणजे शांत झोप लागते. एरंडाचे पान डोक्याला बांधून झोपावे.

पित्तामुळे डोके दुखत असल्यास
पाच काळ्या मनुका रात्री अर्धा कप पाण्यात भिजत घालाव्यात. सकाळी अनशापोटी ते पाणी प्यावे आणि भिजेलेल्या मनुका खाव्यात. डोंगरी आवळा ठेचून त्याचा रस कपाळाला लावावा. अर्धी वाटी गरम दुधात एक चमचा साखर, कामदुधा पाव चिंचोक्याएवढी घालावी. सकाळी व रात्री प्यावी. मोरावळा चमचाभर घेऊन त्यात कामदुधा घालून त्यात सूतशेखर मात्रा मुगाच्या डाळीएवढी उगाळून सकाळी प्यावी.

चंदन
उन्हाळ्यात चंदनाचा लेप उपयुक्त
उन्हाळ्यात अंगावर घामोळे उठल्यास चंदन उगाळून त्याचा लेप अंगाला लावल्यास घामोळे कमी होते. शरीरात कडकी वाढली असल्यास चमचाभर चंदन उगाळून पाण्यात मिसळून प्यावे.

मुळ्याची भाजी खाल्ल्यास गॅस विकार बरे होतात
मुळा पाचक, अग्निदीपक असल्याने मुळ्याची भाजी खाल्ल्यास अजीर्ण, वायूने होणारी पोटदुखी, गॅस हे विकार बरे होतात.

श्वासाच्या दुर्गंधीवर वेलदोडा उत्तम
वेलदोडा चघळणे, हा श्वासाच्या दुर्गंधीवर प्रभावी उपाय आहे. यामुळे तोंडाला दुर्गंधी येणार नाही. शिवाय अति प्रमाणात लागणारी तहानही कमी होईल.

सदाफुलीच्या फुलांनी लट्ठपणा कमी होतो
लट्ठपणा कमी करण्यासाठी आठ-दहा दिवस रोज सकाळी सदाफुलीची 3 पांढरी फुले खूप चावून चावून खावीत. पुन्हा आठ-दहा दिवसानंतर हा प्रयोग करावा. याचबरोबर पचायला हलके पदार्थ भोजनात असावेत. तळलेले पदार्थ, तूप, रबडी, लोणी, मिठाई, साखर खाणे कमी करावे. त्यामुळे लट्ठपणात नक्कीच फरक पडेल.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कार्तिकी एकादशीच्या फराळासाठी खास नवीन आणि हटके रेसिपीज येथे पहा Upvas Recipes for Kartiki Ekadashi

Benefits of guava हिवाळ्यात पेरू खाणे रोगप्रतिकारशक्तीपासून ते पचनापर्यंत अत्यंत फायदेशीर

हिवाळ्यात तुमचे ओठ फुटतात का? त्यांना नैसर्गिकरित्या मुलायम ठेवण्यासाठी घरीच बनवा ''पारिजातक फुलांचा लिप बाम''

पौराणिक कथा : विंध्याचल पर्वताच्या गर्वाचा नाश

Saffron Milk हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट ''केसर दूध'' पिण्याचे प्रमुख फायदे

Show comments