Festival Posters
✕

गुणकारी कडूलिंब

Published: शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2013 (17:54 IST)
कडूलिंबाचे झाड औषधासाठी फारच उपयुक्त आहे. त्यामुळे अगोदरपासूनच लिंबाच्या झाडाच्या उपयुक्ततेबाबत तज्ज्ञ मंडळी सागंत असते. त्यातच रथींद्रनाथ बराल यांच्या नेतृत्वाखालील टीमने या झाडाच्या उपयोगाबाबत नव्याने अभ्यास केला असून, यात कॅन्सरशी लढण्याची क्षमता असल्याचे आढळून आले आहे. एवढेच नव्हे, तर इम्यून सिस्टमशी लढण्याची क्षमताही या माध्यमातून वाढते, असेह मत आहे.

औषधी वनस्पती म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कडूलिंबाच्या झाडाची ओळख आहे. या झाडामध्ये आता कॅन्सरशीही दोन हात करण्याची क्षमता असल्याचे कोलकाता येथील एका आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. चित्तरंजन कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अभ्यासकांनी याचा शोध लावला आहे. ही टीम लिंबाच्या औषधी गुणांचा अभ्यास करीत होती. रथींद्रनाथ बराल यांच्या नेतृत्वाखालील टीमने याचा अभ्यास केला. त्यांनी लिंबाच्या पाल्यातील गुणधर्माचा अभ्यास केला असून, त्यात कॅन्सरशी लढण्याची क्षमता आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. विशेषतः कॅन्सर सेल्ससह शरीरातील इम्यून सिस्टमच्या लढाईस बळ देण्यास लिंब गुणकारी आहे.यासंबंधीच्या अभ्यासावरील लेख ह्यूमन इम्यूनोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून, कॅन्सर पीडित असलेल्या १७ रुग्णांच्या कॅन्सर सेल्सवर यासंबंधी प्रयोग केला आहे. त्यात लिंबाच्या पानांमुळे कॅन्सरची वाढ रोखण्यास मदत झाल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंतचा अभ्यास खरोखरच उत्साह वाढविणारा आहे. एवढेच नव्हे, तर जनावरांवर केलेल्या प्रयोगातूनही ब-याच गोष्टी समोर आल्या आहेत, असे चित्तरंजन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक जयदीप विश्वास यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Methi Lachha Paratha बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा 'मेथी लच्छा पराठा'

बदलत्या ऋतूमध्ये सर्दी आणि ताप टाळण्यासाठी मुलांना काय खाऊ घालावे?

इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा सर्वात कठीण प्रश्न: 'आम्ही तुमचीच निवड का करावी?' याचे द्या असे अचूक उत्तर!

सुरकुत्या आणि सैल त्वचेमुळे त्रस्त आहात का? अपराजिताच्या फुलांचा वापर करून घरीच नाईट क्रीम बनवा

जातक कथा : जसे पेराल, तसे उगवेल....शिंपी आणि हत्तीची गोष्ट

Show comments