Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अफलातून आधुनिक म्हणी

Updated: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (16:13 IST)
१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी
१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण!
१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी!
१९) चोऱ्या करून थकला आणि शेवटी आमदार झाला
२०) आपले पक्षांतर, दुसऱ्यांचा फुटीरपणा!
२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे!
२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा!
२३) जया अंगी खोटेपण, त्या मिळे मोठेपण!
२४) एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो!
२५) सरकार जेवू घालीना, पदवी भीक मागू देईना 
२६) वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यू कशाला!
२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहिले दाखले!
२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे!
२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता!
३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता!
३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार!
३२) मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका!
३३) न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला!
३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा!
३५) पुढाऱ्यांचं मूळ व हॉटेलची चूल पाहू नये!
३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही!
३७) नाव गंगूबाई, अंघोळीला पाणी नाही!
३८) घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा!
३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल!
४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही!
४१) रिकामा माळी ढेकळं फोडी!
४२) घरोघरी मॉडर्न पोरी!
४३) ओठापेक्षा लिपस्टिक जड!
४४) नाकापेक्षा चष्मा जड!
४५) अपुऱ्या कपड्याला फॅशनचा आधार!
४६) बायकोची धाव माहेरापर्यंत!
४७) गोष्ट एक चित्रपट अनेक!
४८) काम कमी फाइली फार!
४९) लाच घे पण जाच आवर!
५०) मंत्र्याच पोर गावाला घोर!
५१) मरावे परी मूर्तिरुपे उरावे!
५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे!
५३) मिळवत्या मुलीला मागणी फार!
५४) रिकामी मुलगी शृंगार करी!
५५) प्रेमात पडला हुंड्यास मुकला!
५६) दुरून पाहुणे साजरे!
५७) ऑफिसात प्यून शहाणा!
५८) सत्ता नको पण खैरनार आवर!
५९) एक ना धड भाराभर पक्ष!
६०) हरावे परी डिपॉझिटरूपी उरावे!
६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे!
६२) तोंडाला पदर गावाला गजर!
६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं!
६४) रात्र थोडी डास फार!
६५) शिर सलामात तो रोज हजामत!
६६) नेता छोठा कटआऊट मोठा!
६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!
६८) दैव देते आयकर नेत!
६९) डिग्री लहान वशिला महान!

सर्व पहा

करण जोहर 'ट्रेटर्स २' शोच्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार

कियारा अडवाणीचे खरे नाव माहित आहे का? सलमान खानच्या या सल्ल्याने तिची ओळख बदलली

मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात रेखा यांना विशेष सन्मान मिळणार; 'उमराव जान' प्रदर्शित होणार

करिश्मा तन्ना आणि पती वरुण बंगेरा आई-बाबा झाले, गुरुपौर्णिमेला छोटा राजकुमार घरी आला

'रामायणम'मधील रकुल प्रीत सिंगचा 'शूर्पणखा' लूक चर्चेत; चाहत्यांनी 'परफेक्ट कास्टिंग' म्हटले

सर्व पहा

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

कियारा अडवाणीचे खरे नाव माहित आहे का? सलमान खानच्या या सल्ल्याने तिची ओळख बदलली

भूमी पेडणेकरच्या सावन पोस्टने खळबळ उडवून दिली: नेटिझन्सने ट्रोल केले

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक; जिथे पावसाळ्यात जमीन आणि आकाश फुलांनी बहरते

पुढील लेख
Show comments