Festival Posters

नोटबंदीचा पाळणा

सोमवार, 19 डिसेंबर 2016 (13:41 IST)
पहिल्या दिवशी झाली नोटबंदी
देशभक्तीची चढली सर्वांना धुंदी 
काळ्या पैश्याची सापडेना मुंडी
जो बाळा जो जो रे जो sss
 
दुस-या दिवशी आला आदेश
रांगेत उभा अवघा हा देश
भक्तगणांचा भारी जल्लोष 
जो बाळा जो जो रे जो sss
 
तिस-या दिवशी वाढला ताण 
चलनाची सर्वत्र झाली चणचण
प्रधानसेवक जाती जापान 
जो बाळा जो जो रे जो sss
 
चवथ्या दिवशी नवा कहर
नोट काढली दोन हजार
सुटे मिळेना झालो बेजार
जो बाळा जो जो रे जो sss
 
पाचव्या दिवशी पाचावर धारण
रांगेत आले अनेकांना मरण
काळा पैसा तरी येईना शरण
जो बाळा जो जो रे जो sss
 
सहाव्या दिवशी संताप संताप
नव्या नियमांचा नवाच ताप 
गडकरी वाड्यात लग्न थाटात
जो बाळा जो जो रे जो sss
 
सातव्या दिवशी काय सांगू कथा
संपेना सा-या देशाची व्यथा
एटीएम पुढे फोडतो माथा
जो बाळा जो जो रे जो sss
 
आठव्या दिवशी क्याशलेसचा मंत्र
फडणवीस घेती डिजिटल संत्र
गरीब शोधतो भाकरीचा चंद्र
जो बाळा जो जो रे जो sss
 
नवव्या दिवशी नवल घडे
नव्या नोटांचे घबाड सापडे
भ्रष्टाचाराला गाडला का रे ?
जो बाळा जो जो रे जो sss
 
आता होतील दिवस पन्नास
आठवले मला आश्वासन खास
मिळेल का दिलासा आता देशास ?
जो बाळा जो जो रे जो sss
 
               - मिलिंद मधुकरराव उमरे

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

हवेत लटकणारे खांब, सतत जळणारी ज्योत; भारतातील या मंदिरांची रहस्ये शास्त्रज्ञांनाही उलगडता आलेली नाही

पेड्डी' हा २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणारा नंबर १ दक्षिण चित्रपट ठरला

स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांनी '370 की बिर्याणी' प्रकरणी माफी मागितली, म्हणाला..

धमाल ४' चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित

'काला हिरण'चा टीझर प्रदर्शित, चित्रपट अत्यंत संवेदनशील वादावर आधारित असल्याचे दिसते

पुढील लेख
Show comments