Dharma Sangrah
✕

होतं असं कधी कधी......

Updated: गुरूवार, 30 मार्च 2017 (14:37 IST)
 
माया,कणव दाटून येते मनात आपल्या...
 
'कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत??' 
 
पाकिटात हात जातो...
 
शंभराची नोट लागते हाती...
 
व्यवहार जागा घेतो ममतेची...
 
समोरचा म्हातारा ओळखतो... बदलतो...
 
"दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा..."
 
तो सुटका करतो आपली पेचातून...
 
आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून...
 
*
 
दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले...
 
आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते...
 
तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा  वेळी...
 
दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात...
 
ती येते...
 
काम आटोपते...
 
तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात असताना ती एक डब्बा देते हातात आपल्या...
 
चिवडा लाडू असतो त्यात...
 
"तुम्ही दर वेळा देता... आज माझ्याकडून तुम्हाला..."
 
'कोण श्रीमंत कोण गरीब', हा विचार सोडत नाही पिच्छा आपला...
 
*
 
ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर...
 
आई उठवते उन्हं अंगावर  आल्यावर...
 
अंगात ताप असतो तिच्या...
 
आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती...
 
मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत...
 
दिवस उलटतात...
 
वडिलांचा एके रात्री फोन येतो...
 
"काम झालं असेल तर आईला एक फोन कर... आज तिचा वाढदिवस होता..."
 
कोडगेपणा म्हणजे हाच तो काय...!
 
चडफडत facebook च्या virtual मित्राना केलेले  birthday विश आठवतात.....
 
लाजत तिला फोन करतो...
 
"आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा..."
 
ती बोलते...
 
कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो...
 
 
अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून...
 
काहीतरी दुरावलंय आपल्यापासून इतकंच जाणवत राहतं...
 
 
खरंच, 
होतं असं कधी कधी....!!!
 
***

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली; 'केबीसी १८'चे चित्रीकरण थांबले, नवीन भाग कधी पाहायला मिळतील?

करीना कपूरचा दिवाळी लूक अडचणीत! कुराणमधील आयत असलेला हार घातल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस

खिशावर ताण न पडता कमी बजेटमध्ये महाराष्ट्रात फिरण्यासाठी ७ सुंदर पर्यटनस्थळे

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीच्या इमारतीला आग, लिफ्टमध्ये अडकलेल्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू; अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख

पुढील लेख
Show comments