Biodata Maker marathi
✕

आई म्हणायची 'श्री' लिहावे

Updated: सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (14:43 IST)
आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची
पाया पडायला भाग.
दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.

आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.

आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!

आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.
अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,

आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.
जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,

आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.
मरण यातना सोसत

आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.

बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतो
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतो.

त्याला कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतो
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतो.

तुमचा शब्द तो कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
तुमच्यासाठी गिळत असतो
नामुष्कीची अवघी लाळ.

तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबा खचत असतो
आधार देता तरी
मान मारून हसत असतो.

तुमच्याकडूनं तसं त्याला
खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्याचं
अवघं पोट भरत असतं.

त्याच्या वेदना कुणालाही
कधीसुद्धा दिसत नाही
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाही.”

त्याच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल

तेव्हा म्हणाल, “ आपला बाबा
खरंच कधी चुकत नव्हता
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होता.”

तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

सचिन सराफ यांचा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; अमित साध प्रमुख भूमिकेत झळकणार ‘प्रताप’ या अ‍ॅक्शन ड्रामामधून

अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्याचे नाव समोर आले

Ye Prem Mol Liya Trailer 'ये प्रेम मोल लिया'चा ट्रेलर प्रदर्शित: आयुष्मान आणि शर्वरीने जिंकली मने; लग्नानंतर येणार एक मोठा वळण!

पुढील लेख
Show comments