Dharma Sangrah

आयुष्य फार सुंदर आहे...

मंगळवार, 5 एप्रिल 2016 (11:52 IST)
पु. ल. म्हणतात - 
 
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.
खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.
 
प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक 
प्रोब्लेमला उत्तर असतंच.
 
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी 
माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच
नसतो.
 
शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर
शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
 
माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला 
काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.
 
बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं 
समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.
 
खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.
 
रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत 
नाही, याचा होतो.
 
आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.
 
सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार 
परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.
 
कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या 
क्षणाची अपूर्वाई आहे.
 
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. 
पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं 
राहावं लागतं.
 
आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं 
आपला उत्कर्ष होतोय.
 
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.
आयुष्य फार सुंदर आहे...
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे...

सर्व पहा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

Maniesh Paul Mother Death मनीष पॉल यांच्या आईचे दुःखद निधन

जकार्तामध्ये पंतप्रधान मोदींनी 'कुछ कुछ होता है' चा उल्लेख केला, करण जोहर भावूक झाले

Wonderful Matheran आशियातील एकमेव 'वाहनमुक्त' थंड हवेचे ठिकाण माथेरान

राम कपूर यांचा धक्कादायक खुलासा: "लग्नापूर्वी मी प्लेबॉय होतो; अनेक महिलांशी माझे संबंध होते"

दादा - द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

Show comments