suvichar

गोड डाळिंब

NDND
एक होती तारामती
तिला डाळिंबे फार आवडत
तिच्या आईने अंगणात एक डाळिंबाचे झाड लावले.
झाड लहान होते
तारामती झाडाला दररोज पाणी घाली
ते झाड हळूहळू मोठे झाले
एके दिवशी तिला एक फूल दिसले
तिला फार आनंद झाला
तिने ते आईला दाखवले
आई म्हणाली,
' आता काही दिवसांनी डाळिंब येईल.
तू दररोज पाणी घाल हं.'
झाडावर आणखी खूप फुले आली
NDND
हळूहळू डाळिंबे पण दिसू लागली
एकदा तारामतीने आईला विचारले,
' आई मी एक डाळिंब काढू का?'
आईने सांगितले,
' जरा थांब, आणखी थोडे दिवस वाट पाहा.'
आणखी काही दिवस गेले
आईला दो तयार डाळिंबे दिसली
ती खूप मोठी होती
ती आईने काढली
मग एक फोडून तिने तारामतीला दाणे दिले.
तारामती म्हणाली
' आई, आई, किती गोड आहे हे डाळिंब?'
' आपल्या शेजारची यमू आजारी आहे
ती काल आईजवळ डाळिंब मागत होती.
आपली डाळिंबे गोड आहेत
आई, हे डाळिंब मी यमूला देऊ का!
तिला ते फार आवडेल.
आणि ती लवकर बरी होईल'
हे ऐकून आईला समाधान वाटले
तिने ते डाळिंब तारामतीला दिले
मग तारामतीने ते यमूला दिले
दाणे खाताना यमूला फार आनंद वाटला.

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

केसांच्या वाढीसाठी कोणत्या वेळी तेल लावावे योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या

सकाळची सुरुवात कशी करता? पहिल्या 10 मिनिटांतल्या सवयी ठरवतात तुमचे आरोग्य

नाते कमकुवत होत असल्याचे हे संकेत ओळखा; वेळेत घ्या योग्य निर्णय

लघु कथा : गोष्ट बुद्धिमान शेतकऱ्याची

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

Show comments