Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निळा कोल्हा Blue Fox Moral Story

Updated: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (11:07 IST)
 
त्या पिंपात नीळ असते. त्या निळीमुळे कोल्ह्याचे अंग निळे होऊन जाते. थोड्यावेळाने कुत्रे नाहीत बघून कोल्हा जंगलात धूम ठोकतो. त्याच्या निळ्या रंगातला अवतार बघून जंगलातले सिंह, वाघ, लांडगे घाबरून जातात. आपल्या जंगलात कोण हा विचित्र प्राणी आला हा विचार ते करू लागतात.
 
आपल्या निळ्या रंगाला जंगलातले सगळे प्राणी भ्याले हे बघून कोल्ह्याला वाटले आता आपल्याला या जंगलात बस्तान बसवता येईल. सर्व प्राण्यांना तो म्हणाला, ''मला ब्रह्मदेवाने तुमच्या रक्षणासाठी उत्पन्न केले. प्राण्यांना कोणीच राजा न उरल्याने ब्रह्मदेवाने मला राजा केले असून माझे नाव ककुद्रुम असे ठेवले आहे.''
 
त्याचे हे सगळे बोलणे ऐकल्यावर सर्व प्राण्यांनी 'होय महाराज' करीत एकच गिल्ला केला. आपली युक्ती सफल झाल्याचे लक्षात येताच, सिंहाला प्रधानपद दिले. वाघाला पलंगावर पहारा करण्याचे काम दिले तर लांडग्याला द्वारपाल म्हणून नेमले. कोल्ह्यांना राज्याबाहेर हाकलले. सिंह, वाघ रोज कोल्ह्यासाठी निरनिराळे प्राणी मारून खाण्यासाठी आणू लागले.
 
एके दिवशी अचानक राजवाड्याबाहेरून कोल्हेकुई ऐकू येत होती. त्याबरोबर या नव्या महाराजांच्या अंगावर रोमांच उभे राहिले... आणि सहजगत्या तेही ओरडू लागले. त्याबरोबर आपण ज्याला राजा समजत होते तो एक क्षुद्र कोल्हा आहे हे लक्षात येताच, सिंह आणि वाघाने त्याचा फडशा पाडला. कोल्होबाला पळायचीसुद्धा संधी दिली नाही.
 
तात्पर्यः कोणत्याही व्यक्तीवर त्याची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय तसेच अनुभव घेतल्याशिवाय विश्वास टाकू नये.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

महिलांनी दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका! ‘या’ सोप्या टिप्सने दात आणि हिरड्या ठेवा निरोगी

फायनान्समध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स करून करिअर बनवा संपूर्ण माहिती जाणून घ्या

Shravan Somwar 2026 Wishes in Marahti श्रावणी सोमवरच्या शुभेच्छा

पावसाळ्यात केस होतात खूप तेलकट? ‘या’ गोष्टींचा हेअर केअर रूटीनमध्ये करा समावेश

''ऑरेंज राईस'' संत्र्याचा ताजा रस आणि मसाल्यांचा भन्नाट सुगंध! Sunday Special Recipe

पुढील लेख
Show comments