त्याबरोबर सगळी माकडे झाडावरून खाली येऊन त्या बांधकाम साहित्यावर नाचू बागडू लागली. सुतारानी एका मोठ्या लाकडला करवतीने कापून त्यात पाचर बसवली होती. एका उपद्व्यापी माकडाने ती पाचर बघितली. त्या लाकहावर बसून ती पाचर काढायचा प्रयत्न ते उपद्व्यापी माकड करू लागले.
त्या प्रयत्नात ती पाचर बाहेर पटकन आली पण शेपटी मात्र त्या लाकडाच्या चिमटीत अडकली. मरणप्राय वेदना त्या माकडाला होत होत्या. माकडाच्या ओरडण्याने मजूर धावत आले. त्यानी त्याला मरेस्तोवर बडवले... आणि उपद्व्यापी माकड प्राणास मुकले.
उपदेश : जी गोष्ट आपल्याला माहीत नाही किंवा कळत नाही त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यात उचापती करू नये.