suvichar
✕

देवाच्या देवळातच चोर

Updated: गुरूवार, 22 नोव्हेंबर 2007 (11:36 IST)
एक माळी आपल्या दोन नोकरांना सोबत घेऊन आपल्या बागेत काम करती असे. एक दिवस त्याचे फावडेच चोरीला गेले. त्याने दोन्ही नोकरांकडे चौकशी केली. परंतु फावडे चोरल्याचे दोघेही कबूल करती नव्हते. मात्रा आपले फावडे या दोन नोकरांपैकी कुणीतरी एकाने चोरल्याची माळ्याला खात्री होती. या दोघांनाही शहरातल्या मोठ्या प्रसिद्ध देवळात नेऊन शपथ घ्यायला लावली तर ते देवाच्या भीतीने खोटी शपथ घेणार नाहीत. ज्याने फावडे चोरले तो चोरी कबूल करील असे माळ्यातला वाटले. म्हणून त्या दोघांना घेऊन काहीतरी कामाचे निमित्त काढून तो त्या शहरात आला.

NDND
' शहरात आलोच आहोत तर देवदर्शन घेऊया.' त्याने नोकरांना सांगितले. दोघांनाही देवळात उभे करून देवासमोर फावडे न चोरल्याची शपथ घ्यायला लावायचा त्याचा विचार होता. तिघेही देवळाजवळ आले. देवळाच्या दारातच दवंडीवाला दवंडी पिटत होता. '' देवाच्या देवळात फार मोठी चोली झाली आहे. जो कुणी चोराचा पत्ता लावील त्याला भलं मोठं इनाम दिलं जाईल.'' दवंडी ऐकून माळी दाराचत थबकला.

प्रत्यक्ष देवासमोर देवाच्या देवळात चोरी होते देवाला न घाबरता, तर हे दोघे सहज खोटी शपथ घेतील. म्हणजे आपले चोरीला गेलेले फावडे देव शोधून देण्यास असमर्थ आहे. तेव्हा काहीही न करता सरळ घरी जाऊन नवीन फावडे खरेदी करून काम सुरू करणे उत्तम.

माळी मनात म्हणाला आणि फक्त देवदर्शन घेऊन सर्वजण परत‍ फिरले.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

Diwali 2026 Wishes in Marathi दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

पाडव्या दिवशी पत्नीला ओवाळणी काय द्यावी? महिलांसाठी खास सरप्राईज आयडियाज

Baked Chakli अजिबात न तळता बनवा बेक्ड चणा डाळ चकली; टेस्टी आणि सुपर हेल्दी!

Happy Dhanteras Wishes 2026 images

Abhyanga Snan 2026 Wishes in Marathi नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नान शुभेच्छा

Show comments