suvichar

बोध कथा: समाधानी असावे

मंगळवार, 25 ऑगस्ट 2015 (11:28 IST)
एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? 
 
तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस? भुंगा म्हणाला, अगं चिमणे, परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्‍याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.
 
तात्पर्य:- जे असेल त्यात समाधानी असावे.
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

शरीरात पोटॅशियमची कमतरताची लक्षणे, कारणे उपाय जाणून घ्या

दहावी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! या विभागांमध्ये नौकरीची संधी

केसांच्या वाढीसाठी कोणत्या वेळी तेल लावावे योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या

सकाळची सुरुवात कशी करता? पहिल्या 10 मिनिटांतल्या सवयी ठरवतात तुमचे आरोग्य

नाते कमकुवत होत असल्याचे हे संकेत ओळखा; वेळेत घ्या योग्य निर्णय

Show comments