suvichar
✕

तुमच्या रोजच्या जेवणाला 'स्पेशल टच' देण्यासाठी या ४ सोप्या टिप्स नक्की वापरून पहा

Updated: सोमवार, 20 एप्रिल 2026 (19:33 IST)
ALSO READ: शेंगदाणे खमंग आणि कुरकुरीत भाजण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
२. भाज्यांमध्ये कसुरी मेथीचा वापर
बहुतेक पंजाबी आणि रेस्टॉरंट भाज्यांमध्ये एक विशिष्ट सुगंध असतो, तो 'कसुरी मेथी'मुळे येतो.
टीप: कोणतीही रस्सा भाजी किंवा सुकी भाजी (उदा. फ्लॉवर, बटाटा किंवा पनीर) तयार होताना शेवटी थोडी कसुरी मेथी हातावर चोळून वरून टाका. यामुळे भाजीला एक शाही सुगंध आणि चव प्राप्त होते.
 
३. पांढरे तीळ किंवा शेंगदाण्याऐवजी काजूची पेस्ट
आपण घरी सहसा भाजीला दाटपणा येण्यासाठी शेंगदाण्याचं कूट वापरतो. पण जर तुम्हाला हॉटेलसारखी 'रिच' ग्रेव्ही हवी असेल, तर थोडे बदल करा.
टीप: ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये काजूची पेस्ट किंवा मगज बी (Melon seeds) वाटून टाका.
जर काजू नसतील, तर थोडं दही किंवा साय फेटून भाजी उतरवण्यापूर्वी टाका. यामुळे भाजीला छान क्रीमी टेक्सचर मिळते.
 
४. भाज्यांची 'धुंगार' पद्धत 
रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या कोळशावरच्या भाज्यांची चव घरी आणण्यासाठी 'धुंगार' ही सर्वोत्तम पद्धत आहे.
टीप: भाजी तयार झाल्यावर गॅस बंद करा. एका वाटीत पेटलेला कोळसा ठेवून ती वाटी भाजीच्या पातेल्यात मध्यभागी ठेवा. कोळशावर थोडे तूप किंवा तेल टाका आणि लगेच झाकण बंद करा. ५ मिनिटांत तुमच्या साध्या भाजीला चविष्ट 'स्मोकी फ्लेवर' येईल.
 
तसेच जेवण वाढताना त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे साजूक तूप टाकल्यास जेवणाची रंगत अजूनच वाढते!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: या ट्रिक तुमच्या जेवणाची चव वाढवतील, नक्की अवलंबवा
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता निवड प्रक्रियेबद्दल जाणून घ्या

सणासुदीत त्वचेवर आणा नैसर्गिक चमक! चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्किन केअर टिप्स

दिवाळीत फटाक्यांच्या धुराचा डोळे आणि फुफ्फुसांवर होऊ शकतो परिणाम; संरक्षणासाठी जाणून घ्या या महत्त्वाच्या टिप्स!

मुलाचा शाळेत छळ होतोय का? ही लक्षणे दिसताच पालकांनी व्हा सावध!

पंचतंत्र : कावळा आणि घुबड यांच्यातील वैमनस्याची कथा

पुढील लेख
Show comments