deepawali
✕

बरस रे घना...

Updated: गुरूवार, 13 जुलै 2017 (16:34 IST)
त्याची आणि पावसाची मैत्री काही न्यारी असते. नेमकी ती भेटावयास आली की, पाऊस बरसून मदत करणार. मग तीच या पावसावर आणि त्याच्यावर रुसव्य ा फुगव्यांची बरसात करते. पण मनापासून तिला हा पाऊसही आवडतो आणि तोही. कारण या पावसाच्या साक्षीनेच प्रीतीचा गारवा दोघांच्याही मनामध्ये गंधीत होत असतो. पावसामुळे दरवळणारा मातीचा गंध, ते टपोर थेंब, वा-याची येणारी ती झुळूक, चिंब भिजल्यानंतर एकमेकांना नयनात शोधणा-या त्या नजरा आणि तिच्या भिज-या चेह-यावरील आनंद पाहण्याचे मिळालेले ते भाग्य त्याला आणि तिला अगदी बेधुंद करून जाते. पावसाने तिची अडवलेली वाट त्याच्यासाठी एक प्रीतीची भेटच ठरून जात नाही. मित्रांनो, यामध्ये पाऊस आपली मैत्री निभावतो आणि आपण आपली प्रीत फुलवतो.

अजूनही आठवतंय मला, एकदा या वेड्या पावसाने तिची अशीच वाट अडविली होती. पण ती त्या पावसावर थोडीही रागावली नाही. उलट तिनं या पावसाचा मनमुराद आनंद घेतला. या पावसाचा तिला इतका आनंद झाला होता की, आता तिला तिनं आणलेल्या छत्रीचंही भान राहिलं नव्हतं की, घरी जाण्यासाठी होणारा उशीरही ती विसरली होती. त्या पावसात अगदी चिंब चिंब भिजली ती. पावसाच्या रिमझीम सरी अंगावरती घेत ती माझ्यावर पाणी उडवीत होती आणि मी तिचं भिजलेले रूप न्याहळत होतो. माझ्याशी हुज्जत घालून चहा पिण्याचा आनंदही अगदी मनमुरादपणे तिनं यावेळी घेतला होता.

पावसाची सर आणि तिचं सौंदर्य यांचा मिलाफ त्या क्षणाला अगदी गुलाबी करून गेला होता. अशीच ओढ वाढविताना मित्रांनो हा पाऊस त्याच्या आणि तिच्या भेटी घेत. खरंच त्याला आणि तिला काही क्षण का होईना पण हृदयातील प्रीतीचे मनमोहक क्षण बहाल करणारा हा पाऊस वेडाच भासतो नाही. कोण जाणे त्याला कशा कळतात हृदयातील या भावना. त्यानेही प्रेम केले असेल का कुणावर ? कुणीतरी दिला असेल त्यालाही प्रीतीचा गुलमोहर. कुणीतरी पाहावयास लावली असेल त्यालाही वाट. म्हणून नाही का हा पाऊसच शाहण्यासारखा धाऊन येतो. एकांताच्या क्षणी दोघांच्याही आनंदाला मोकळी वाट करून देण्यासाठी. दुनिया काहीही म्हणो पण त्या दोघांचीही प्रीत या रिमझीम पावसाच्या सरीशिवाय गंधीत होऊन फु लत नाही हेच खरे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

हितोपदेशातील मनोरंजक कथा: म्हातारा वाघ आणि वाटसरूची कहाणी

Happy Diwali 2026 Wishes Images दिवाळी शुभेच्छा इमेजेस

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

थंडीच्या दिवसांत नाश्त्यासाठी पौष्टिक थालीपीठ; साहित्य आणि कृती जाणून घ्या

Maharashtra NEET Admission ६ फेऱ्यांनंतरही १३८ जागा रिक्त, खासगी महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी नाही

पुढील लेख
Show comments