Dharma Sangrah

Love Tips : डेटवर जातांना करू नका या चुका

Updated: शनिवार, 6 एप्रिल 2024 (17:53 IST)
 
1. उशिरा पोहचणे     
अनेक लोक प्रत्येक ठिकाणी उशीर करतात आणि त्यांना वेळेवर पोहचण्याची सवय नसते. तसेच ट्रॅफिक आणि काममुळे खूप वेळेस पोहचायला उशीर होतो. डेट वर नेहमी वेळेवर पोहचावे. कोणालाच वाट पाहायला आवडत नाही. सोबतच हे तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रभावित करते. समोरच्या व्यक्तीच्या वेळेचा मान ठेवणे आणि वेळेवर पोहचण्याचा प्रयत्न करावा. 
 
2. पर्सनल स्पेसचा सम्मान करावा  
अनेक लोक पहिल्या डेट वर जास्त फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या पर्सनल स्पेसचा सम्मान करायला हवा. पहिल्या डेट मध्ये जास्त फिजिकल कांटेक्ट करण्याचा प्रयत्न करू नये. सोबतच असा कोणताही खाजगी प्रश्न करू नये ज्यामुळे तुमचा जोडीदार अस्वस्थ होईल. जास्त खाजगी प्रश्न विचारल्याने तुमच्या व्यक्तिमत्वावर नकारात्मक प्रभाव पडेल. 
 
3. सारखा फोनचा उपयोग करू नका    
अनेक लोक बोलतांना मोबाईल हाताळत असतात. पण तुमचा जोडीदाराला वाटते की तुमचे लक्ष त्याच्याकडे असावे. जर तुम्ही वारंवार मोबाईल हाताळत असाल तर बॉडी लैंग्वेजने कळते की तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यात इन्ट्रेस्ट नाही. अनेक लोक नजरेला नजर मिळवू शकत नाही कारण ते वारंवार मोबाईल पाहतात ही  वाईट सवय आहे जी तुमच्या रिलेशनशिपला बिघडवू शकते. 
 
4. प्रश्न विचारू नये   
डेटमध्ये तुम्ही प्रश्न विचारावे पण जास्त खाजगी प्रश्न विचारू नये. जोडीदाराची मनस्थिती पाहून प्रश्न विचारावे. यामुळे तुम्ही गोष्टीला पुढे नेऊ शकतात. सोबतच जोडीदाराचा रिप्लाय काळजीपूर्वक ऐकावा मध्येच थांबवू नये. अनेक लोक समोरच्या व्यक्तीचे बोलणे चालू असतांना मध्येच बोलायला लागतात. यामुळे चुकीचा प्रभाव पडतो. 
 
5. योग्य ऑउटफिट घालावे   
तुमचे कपडे तुमचे फर्स्ट इम्प्रैशन असतात. तसे पाहिला गेले तर तुम्हाला जे कपडे आवडतात तेच कपडे घालावे. तसेच इतरांप्रमाणे दिसण्याचा प्रयत्न करू नये. साधे, स्वच्छ आणि आपल्या अनुसार चांगले कपडे घालावे. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments